सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या सुपरस्टारचा ४०० कोटींचे बजेट असलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर असा आपटला की निर्मात्यांचे पैसे बुडाले. हिरोची प्रचंड लोकप्रियताही या चित्रपटाला वाचवू शकली नाही. मात्र, हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होताच संपूर्ण चित्रच बदललं. ज्या चित्रपटाला थिएटर्समध्ये प्रेक्षक मिळत नव्हते, तो ओटीटीवर ट्रेंडिंग आहे.
आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव ‘द राजा साब’ आहे. ४०० कोटींच्या अवाढव्य बजेटमध्ये चित्रपट तयार झाला होता. पण साऊथ सिनेमाचा ‘बाहुबली’ म्हणजेच प्रभासचा हा चित्रपट थिएटरवर फ्लॉप ठरला. यामुळे निर्मात्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. पण हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आणि त्याचं नशीब बदललं. या चित्रपटाने ओटीटीवर असा धुमाकूळ घातला की सर्वच थक्क झाले. थिएटरमध्ये प्रेक्षकांनी पाठ फिरवलेला हा चित्रपट आता ओटीटीवर ट्रेंडिंग आहे.
द राजा साब सिनेमाची कथा
चित्रपटाची कथा राजूभोवती (प्रभास) फिरते. तो त्याच्या आजीबरोबर राहतो. तिला अल्झायमरचा असतो. पण तिला तिचा नवरा कनक राजू आठवतो, जो वर्षानुवर्षे गायब असतो. राजू त्याच्या आजोबांच्या शोधात निघतो आणि तो एका जुन्या, झपाटलेल्या हवेलीत पोहोचतो.
द राजा साब सिनेमाचे कलेक्शन
‘द राजा साब’ हा चित्रपट ९ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे बजेट सुमारे ४०० कोटी रुपये होते. चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटी रुपये कमावत धमाकेदार ओपनिंग केली होती. पण नंतर तो फार चांगली कामगिरी करू शकला नाही. या चित्रपटाने जगभरातून एकूण सुमारे २०६.५७ कोटी रुपयांची कमाई केली. त्यापैकी भारतात त्याने १४६ कोटी रुपये कमावले होते. चित्रपटाने आपले केवळ ३६% बजेट वसूल केले. चित्रपटगृहात फारशी कमाल दाखवू शकला नसला तरी, या चित्रपटाला डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कुठे पाहायचा द राजा साब?
४०० कोटींच्या मेगा-बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट थिएटरमध्ये आल्यावर त्याला सुरुवातीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पण कमकुवत कथेमुळे तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. प्रभासचे स्टारडमही या सिनेमाला वाचवू शकले नाही. नंतर निर्मात्यांनी तो ओटीटीवर आणला. ओटीटीवर रातोरात चित्रपट ट्रेंड करू लागला. द राजा साब जिओहॉटस्टारवर तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करतोय. तुम्ही तो पाहिला नसेल तर घरबसल्या पाहू शकता.
