आता एखाद्या चित्रपटाचे यश फक्त बॉक्स ऑफिसपुरते मर्यादित राहत नाही. सिनेमागृहांत न चालेलेल्या सिनेमांना नंतर ओटीटीवरदेखील प्रेक्षकांकडून पसंती मिळते. असंच काहीसं घडलं आहे, प्रभासच्या एका चित्रपटाबरोबर. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता या सिनेमाला ओटीटीवरही पसंती मिळत आहे.
प्रभासचा हा चित्रपट म्हणजे ‘सालार’. २०२३ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. चित्रपटगृहांत रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आणि सध्या हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंगमध्ये आहे.
‘सालार’ ओटीटीवर ३६६ दिवस ट्रेंडिंग
२७० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात ७०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. २०२३ मध्ये हा रिलीज झालेल्या या चित्रपटाला चित्रपटगृहांत संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. जिओ हॉटस्टारवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज झाला आहे.
‘सालार’ हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज झाला आहे आणि गेले ३६६ दिवस ट्रेंडिंगमध्येसुद्धा आहे. ‘सालार’मधील प्रभासची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली असून ओटीटीवर मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर प्रभासने सोशल मीडियावर प्रेक्षकांचे आभार मानले.
‘सालार’मध्ये प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपटात खानसार’ या एका काल्पनिक शहरामधल्या बालपणीचे मित्रांची गोष्ट दाखवली गेली आहे. दोघांमध्ये काही कारणांनी वैर असल्यामुळे ते दूर जातात, पण नंतर एकमेकांसमोर येतात.
लवकरच आता या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा पुन्हा प्रशांत नील करणार आहेत. चाहते या नवीन भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘सालार’चा दुसरा भाग २०२६ मध्ये रिलीज होणार आहे.
प्रभासचे आगामी प्रोजेक्ट
प्रभासने अलीकडे ‘द राजा साब’ चित्रपटात काम केले, मात्र हा बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई करू शकला नाही. आता लवकरच तो संदीप रेड्डी वांगा यांच्या चित्रपट ‘स्पिरिट’मध्ये दिसणार आहे.

