Prajakta Mali on Amruta Khanvilkar: अमृता खानविलकर काही दिवसांपूर्वी ‘लग्नपंचमी’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘लग्नपंचमी’ या नाटकात तिच्याबरोबर स्वप्नील जोशीदेखील प्रमुख भूमिकेत आहे. हे नाटक मधुगंधा कुलकर्णीने लिहिले आहे, तर निपुण धर्माधिकारीने या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. सध्या या नाटकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

प्राजक्ता माळी म्हणाली…

याबरोबरच अमृता आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. तिची महत्त्वाची भूमिका असलेली ‘तस्करी: द स्मगलर्स वेब’ ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. इमरान हाश्मी प्रमुख भूमिकेत असून फ्रेडी दारूवाला, अनुजा साठे, जामिल खान, हेमंत खेर, शैलेश दातार, हृषिकेश जोशी, मोहित दागा, शरद केळकर, नंदिश संधू, अमृता खानविलकर असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

तस्करीमध्ये अमृताने मिताली कामत ही भूमिका साकारली आहे. तस्करीमधील तिच्या भूमिकेचे मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे. तिच्या फायटिंग सिक्वेन्सची चर्चादेखील होत आहे. अमृताने अशी भूमिका पहिल्यांदाचा साकारली आहे.

आता लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्रावर स्टोरी शेअर करत तिने अमृताची तस्करी वेब सीरिज पाहत असल्याचे सांगितले आहे. तसेच एक व्हिडीओ शेअर करत अमृताचा फायटिंग सिक्वेन्स आवडला असल्याचे तिने लिहिले आहे.

प्राजक्ताने लिहिले, “माझी स्ट्रॉंग मुलगी दमदार फायटिंग सिक्वेन्स करत असल्याचे पाहत आहे.” पुढे तिने अमृताला टॅग करत तू उत्तम काम केलं आहेस, असं लिहित तिचे कौतुक केले. प्राजक्ताने शेअर केलेल्या या स्टोरीवर अमृताने आय लव्ह यू असे लिहिले आहे.

प्राजक्ता आणि अमृता दोघी एकमेकींच्या उत्तम मैत्रिणी आहेत. त्या अनेकदा एकमेकींबरोबर फोटो शेअर करतात. तसेच, सोशल मीडियावर काहीवेळा फोटोदेखील पोस्ट करतात.

अमृता मराठीबरोबरच हिंदीमध्येही काम करत असल्याचे दिसते. तिची ‘राझी’ चित्रपटातील भूमिका लोकप्रिय ठरली होती. आता आगामी काळात ती कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमृता डान्ससाठीदेखील लोकप्रिय आहे. तस्करी ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.

प्राजक्ता माळीबद्दल बोलायचे तर ती नुकतीच ‘देवखेळ’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेब सीरिजमध्ये तिने सारिका निमकर ही भूमिका साकारली आहे. अंकुश चौधरी या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत आहे. ही वेब सीरिज झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.