Prime Video Horror Series : अनेकांना ओटीटीवर जगभरातील चित्रपट, मालिका व सीरिज पाहण्याची आवड असतात. ओटीटीचे चाहते घरबसल्या जगभरातील कंटेंट पाहणं पसंत करतात. अलीकडे हॉरर चित्रपट व सीरिजची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे, कारण प्रेक्षक अशा कलाकृती पाहणं पसंत करतात. हॉरर सीरिजच्या चाहत्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सीरिजबद्दल सांगणार आहोत. २०२५ मध्ये आलेल्या या सीरिजचा दुसरा सीझन लवकरच येणार असून प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल उत्सुकता आहे. ही हॉरर वेब सीरिज कोणती, ती कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येईल आणि त्यात कोणते कलाकार आहेत, हे जाणून घेऊयात.

या सीरिजचं नाव आहे अंधेरा. ही सीरिज आठ भागांची आहे. अंधेरा सीरिज १४ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज झाली होती. या सीरिजमध्ये मराठी कलाकारही आहेत. तसेच अनेक ओटीटी स्टारही आहेत. जर तुम्ही ही सीरिज अजून पाहिली नसेल, तर या वीकेंडला ओटीटीवर ती नक्की पाहा.

कुठे पाहायची अंधेरा सीरिज?

अंधेरा ही एक सुपरनॅचरल हिंदी थ्रिलर वेब सीरिज आहे. या सीरिजमध्ये एका बेपत्ता झालेल्या मुलीला शोधण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. अंधेराचे दिग्दर्शन राघव दार यांनी केले आहे. हॉरर सीरिज पाहायला आवडत असेल त्यांनी अंधेरा ही सीरिज चुकवू नये.

अंधेरा सीरिजमधील कलाकार

अंधेरा सीरिजमध्ये दमदार कलाकारांची मांदियाळी आहे. सुरवीन चावला, प्राजक्ता कोळी, वत्सल सेठ, प्रिया बापट, करणवीर मल्होत्रा, प्रणय पचौरी, परवीन डबास, गौरव शर्मा हे कलाकार आहेत. प्रिया बापटने इन्स्पेक्टर कल्पनाची भूमिका केली आहे. तर प्राजक्ता कोळी रुमीच्या भूमिकेत, सुरवीन चावला आयेशा आणि करणवीर मल्होत्रा जय या भूमिकेत आहे.

आयएमडीबीवर सीरिजचे रेटिंग

अंधेरा या लोकप्रिय वेब सीरिजला IMDb वर ५.९ रेटिंग मिळाले आहे. पण या सीरिजला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली. तसेच या सीरिजचा सीझन 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि प्रेक्षक त्याबद्दल खूप उत्सुक आहेत. ही हॉरर सीरीज तुम्ही OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर पाहू शकता. OTT प्लॅटफॉर्मवरील टॉप हॉरर सीरीजच्या यादीत ती दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.