Prime Video Trending Movie: प्रेक्षक दर आठवड्याला रिलीज होणाऱ्या नवीन चित्रपटांची व वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहतात. बऱ्याच जणांचा वीकेंड प्लॅन ओटीटीवर सिनेमे बघणं हा असतो. प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन कलाकृती रिलीज होत असतात. नुकताच प्राइम व्हिडीओवर एक दमदार चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करतोय. चला या चित्रपटाची कथा, त्यातील कलाकारांबद्दल जाणून घेऊयात.

जेव्हा सस्पेन्स चित्रपटांची चर्चा होते, तेव्हा आपण नेहमीच काही निवडक उत्कृष्ट चित्रपटांचा उल्लेख करतो. कारण या सिनेमांचा क्लायमॅक्स दमदार असतो. आजकाल, निर्माते फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यासाठी अनेक उत्तम सस्पेन्स थ्रिलर चित्रपट तयार करत आहेत. हे चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. त्यातील ट्विस्ट व सस्पेन्स असा असतो की स्क्रीनवरून नजर हटत नाही.

चित्रपटाची सुरुवात बघता शेवट कसा होईल, असा अंदाज प्रेक्षक बांधतात पण क्लायमॅक्स मात्र डोकं चक्रावणारा असतो, ज्याची कल्पना प्रेक्षकांनी केलेली नसते. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या प्राइम व्हिडीओवरील एका चित्रपटात अशा सस्पेन्सचा पूर्ण डोस देण्यात आला आहे.

काय आहे सुपरहिट चित्रपटाचं नाव?

दिग्दर्शक जेनूस मोहम्मद सध्या त्यांच्या डार्क सस्पेन्स थ्रिलरसाठी चर्चेत आहेत. या चित्रपटाचं नाव ‘ड्राइव्ह’ असं आहे. हा चित्रपट आधी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडीओवर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा सस्पेन्स इतका जबरदस्त आहे ती तो पाहणं हा तुमचा खास वीकेंड प्लॅन असू शकतो.

‘ड्राइव्ह’ ही कथा एका मीडिया कंपनीच्या मालकाभोवती फिरते जो प्रचंड यशस्वी असतो, पण एका घटनेनंतर त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलते. हॅकर्सचा एक ग्रुप त्याला टार्गेट करतो आणि मग तो अडकतो की त्याच्या जवळच्या लोकांचे जीव धोक्यात येतात. हॅकर्सचे नियम पाळण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसतात. ओटीटीवर रिलीज झाल्यापासून ड्राइव्ह नंबर 1 वर ट्रेंडिंग करत आहे. तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.

ड्राइव्ह चित्रपटात श्रीराम रेड्डी पोलसेन, आदी, अनिश कुरुवेल्ला, मॅडोन सॅबेस्टियन हे कलाकार आहेत.