This Series Is Trending On Prime Video : ओटीटीवर नवीन चित्रपट आणि वेब सीरिज पाहणाऱ्यांसाठी या आठवड्यातही अनेक नव्या कलाकृती वेगवेगळ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्या आहेत. त्यापैकी एका सीरिजची सध्या बरीच चर्चा सुरू आहे.

महत्त्वाचं म्हणजे या सीरिजचं फार प्रमोशन करण्यात आलं नव्हतं तरीसुद्धा या सीरिजची चर्चा सुरू आहे. सध्या टॉप ट्रेंडमध्ये असलेली ही सीरिज म्हणजे ‘सिटाडेल’चा (Citadel)दुसरा सीझन आहे. या सीरिजमध्ये प्रियांका चोप्राबरोबर अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

प्रियांका चोप्राची सीरिज होतेय ट्रेंड

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवरील सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिजपैकी एक असलेल्या ‘सिटाडेल’च्या पहिल्या सीझनला चांगलं यश मिळाल्यानंतर आता त्याचा दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रियांका चोप्रा, रिचर्ड मॅडन Richard Madden आणि Stanley Tucci यांच्याबरोबर पुन्हा एकदा झळकणार आहे. ही सीरिज सध्या अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर ट्रेंड करत आहे. जगभरात ही सीरिज टॉप २ मध्ये स्थान मिळवत असून प्रेक्षकांकडून सीरिजला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोट्यवधींचं आहे बजेट

प्रियांका चोप्राच्या या सीरिजबद्दल बोलायचं झालं तर ‘सिटाडेल’ या सीरिजचं बजेट सुमारे २१०० कोटी रुपये इतकं आहे. इतक्या मोठ्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सीरिजच्या कथेत मात्र अपेक्षेइतकी ताकद नसल्याचं अनेकांचं मत आहे.

प्रियांकाच्या कामाचं होतंय कौतुक

प्रियांका चोप्राच्या या सीरिजमध्ये यावेळी काही नव्या कलाकारांचीही एंट्री झाली आहे. ‘सिटाडेल’ Citadelच्या नव्या सीझनमध्ये प्रियांका आणि Richard Madden यांची कथा पुढे दाखवण्यात आली आहे. एजंट नादिया बनलेली प्रियांका आपल्या मुलीबरोबर शांत आयुष्य जगत असते. दुसऱ्या सीझनची कथा पहिला सीझन जिथे संपला होता, तिथूनच पुढे सुरू होते. मात्र या संपूर्ण सीझनमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेते ती प्रियांका चोप्रा. कॅमेरा वर्क, लोकेशन्स आणि व्हिज्युअल्स खूपच प्रभावी आहेत, पण कथा थोडी कमकुवत वाटते असं अनेकांचं म्हणणं आहे. प्रियंकाचा अॅक्शन दमदार असला, तरी सतत दाखवलेले फ्लॅशबॅक आणि वारंवार बदलणारी टाइमलाइन यामुळे सीरिज काहीशी गोंधळलेली आणि कमकुवत वाटते.

या सगळ्या गोष्टी असूनही ‘सिटाडेल’Citadel सध्या टॉप ट्रेंडमध्ये आहे आणि प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजची खरी ताकद म्हणजेच प्रियांका चोप्रा. विशेष म्हणजे, यावेळी ती काही हिंदी डायलॉग्स बोलतानाही दिसते. या सीरिजमध्ये प्रियंकाबरोबर Richard Madden, Stanley Tucci हे कलाकार आहेत. तसंच यावेळी राहुल कोहली, Gabriel Leone आणि Jack Reynor यांचीही एंट्री झाली असून त्यांनी कथेत नवे ट्विस्ट आणले आहेत.

‘सिटाडेल’च्या पहिल्या सीझनचं बजेट सुमारे २८०० कोटी रुपये होतं, तर दुसऱ्या सीझनचं बजेट जवळपास २१०० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे ही प्राईम व्हिडीओवरील सर्वात महागड्या सीरिजपैकी एक मानली जाते. विशेष म्हणजे, कोणताही मोठा गाजावाजा किंवा जोरदार प्रमोशन न करता देखील ही सीरिज रिलीज होताच जगभरात प्राइम व्हिडीओवर नंबर २ वर ट्रेंड करत आहे.