उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे बरेच लोक उन्हात बाहेर जाण्यापेक्षा घरी राहणं पसंत करतात. घरी बसून सुपरहिट चित्रपट, वेब सीरिज पाहणं पसंत करतात. ओटीटीवर जगभरातील कंटेंट उपलब्ध आहे. तुम्ही जर ओटीटीवर काहीतरी चांगलं पाहायचा विचार करत असाल तर सायकोलॉजिकल हा मिस्ट्री थ्रिलर चित्रपट नक्की पाहायला हवा.

या चित्रपटातील क्लायमॅक्समधील अनपेक्षित ट्विस्ट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतील. इतकंच नाही तर या चित्रपटाला आयएमडीबीवर खूप चांगले रेटिंग मिळाले आहे.

तुम्ही ओटीटीवर थ्रिलर, क्राइम, ॲक्शन आणि हॉरर यासह अनेक जॉनरचे चित्रपट व सीरिज पाहिल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला एका सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. हा दाक्षिणात्य चित्रपट २०२४ मध्ये रिलीज झाला होता आणि याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

या चित्रपटाचे नाव काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर ते जाणून घ्या. या दाक्षिणात्य सिनेमाचे नाव ‘किष्किंधा कांडम’ असे आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन दिनजीथ अय्याथन यांनी केलं आहे आणि या चित्रपटात आसिफ अली, अपर्णा बालमुरली, विजयराघवन सारखे दिग्गज कलाकार आहेत. २ तास ५ मिनिटांच्या या चित्रपटाचे नाव ‘रामायण’च्या किष्किंधा कांडापासून प्रेरित आहे.

काय आहे चित्रपटाची कथा?

‘किष्किंधा कांडम’च्या कथेबद्दल बोलायचे झाल्यास, जंगलात राहणाऱ्या लोकांवर आधारित हा चित्रपट आहे. एका एनजीओत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं लग्न होतं. त्याचे वडील लष्करी अधिकारी असतात आणि त्यांना स्मृतीभ्रंश झालेला असतो. यामुळे त्यांना नोकरीवरून काढलेलं असतं. त्या अधिकाऱ्याजवळची बंदूक अचानक एकेदिवशी गायब होते.

काही दिवसांनी जंगलात गोळीबाराचा आवाज ऐकू येतो आणि नंतर त्याचा तपास सुरू होतो. त्यावेळी ती बंदूक एका माकडाच्या हातात दिसते. त्यानंतर ज्या गोष्टी समोर येतात त्या धक्कादायक असतात. या चित्रपटाचा शेवट पाहून तुम्हाला धक्का बसेल.

‘किष्किंधा कांडम’चे बजेट व बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘किष्किंधा कांडम’ या चित्रपटाचे बजेट फक्त सात कोटी रुपये होते. या चित्रपटाने भारतात तब्बल ४९.०२ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर जगभरात या चित्रपटाने ७६.५२ रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते.

कुठे पाहता येईल चित्रपट?

हा चित्रपट तुम्ही घरबसल्या जिओ हॉटस्टारवर पाहू शकता. ‘किष्किंधा कांडम’ या चित्रपटाला आयएमडीबीवर ८ रेटिंग मिळाले आहे.