Radhika Apte Movies on OTT: मराठमोळ्या राधिका आपटेने स्वबळावर बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. तिने करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ती चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारते. तिने बॉलीवूडमधील अनेक आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे. २००५ मध्ये ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटात शाहीद कपूरबरोबर काम करून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. मागील १९ वर्षांत तिने रोमँटिक आणि ॲक्शनसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

राधिकाचे बरेच चित्रपट ओटीटीवर उपलब्ध आहेत. त्यापैकी काही चित्रपटांमध्ये राधिकाने खूप बोल्ड भूमिका साकारल्या होत्या. तिचे हे चित्रपट तुम्ही कुटुंबाबरोबर पाहू शकत नाही.

लस्ट स्टोरीज

Lust Stories on OTT: २०१८ मध्ये रिलीज झालेल्या ‘लस्ट स्टोरी’मध्ये राधिका आपटेसह कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर, विकी कौशलसह अनेक स्टार्स होते. या चित्रपटात वेगवेगळ्या चार कथा दाखवण्यात आल्या होत्या. यात अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता. झोया अख्तर, अनुराग कश्यप, करण जोहर आणि दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

१५ ऑगस्टला प्रदर्शित झालेला चित्रपट आला OTT वर, या वीकेंडला बॅड न्यूजसह ‘हे’ सिनेमे घरबसल्या पाहता येणार

फोबिया

Phobia on OTT: २०१६ मध्ये रिलीज झालेल्या ‘फोबिया’ या चित्रपटातही राधिका मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटातील राधिकाचे पात्र खूप बोल्ड होते. या थ्रिलर मिस्ट्री चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. हा चित्रपट झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

रेखा यांच्याबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यावर अमिताभ बच्चन म्हणाले होते, “ती माझी…”

हंटर

Hunter on OTT: गुलशन देवय्या आणि राधिका आपटे यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित हा एक अडल्ट कॉमेडी चित्रपट आहे. ‘हंटर’मध्ये राधिका तृप्ती गोखले नावाच्या भूमिकेत होती. हा चित्रपट प्राइम व्हिडीओ आणि जिओ सिनेमावर उपलब्ध आहे.

अभिनेत्री राधिका आपटे (फोटो – इन्स्टाग्राम)

Video: तीन वर्षांपूर्वी नौदल अधिकाऱ्याशी बांधली लग्नगाठ, अभिनेत्री ३७ व्या वर्षी होणार आई, व्हिडीओ शेअर करून दिली Good News

पार्च्ड

Parched on OTT: राधिका आपटे व सुरवीन चावला यांचा हा चित्रपट २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. यातही राधिकाने साकारलेले पात्र खूप बोल्ड होते. पार्च्ड हा चित्रपट प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता.

द वेडिंग गेस्ट

The Wedding Guest on OTT : २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘द वेडिंग गेस्ट’ या थ्रिलर ॲक्शन चित्रपटात देव पटेल व राधिका आपटे यांच्या भूमिका होत्या. या सिनेमातही अभिनेत्रीचा बोल्ड अवतार पाहायला मिळाला होता, जो लोकांना खूप आवडला होता. ‘द वेडिंग गेस्ट’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.