scorecardresearch

Premium

मशिनच्या पंज्यामध्ये अडकला राजकुमार; ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’चे पोस्टर प्रदर्शित

हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

monica, o my darling poster
नेटफ्लिक्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.

राजकुमार राव बॉलिवूडमधला सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आपल्या अभिनय कौशल्याने सिनेसृष्टीमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. या वर्षामध्ये त्याचे ‘बधाई दो’ आणि ‘हिट-द फस्ट केस’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. तो पुढच्या महिन्यामध्ये नव्या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला येणार आहे. या चित्रपटाशी संबंधित नवी बातमी समोर आली आहे.

‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ असे राजकुमारच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासह राधिका आपटे, हुमा कुरेशी आणि सिकंदर खेर असे कलाकार दिसणार आहेत. मागच्या महिन्यामध्ये या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. टीझरवरुन हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर या चित्रपट शैलीतला आहे असा अंदाज लावला जात आहे. नेटफ्लिक्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले.

junior ntr saif ali khan and janhvi kapoor starrer telugu film devara
दाक्षिणात्य सुपरस्टारसह जान्हवी कपूर करणार रोमान्स, तर सैफ अली खान साकारणार ‘ही’ भूमिका, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
kangana-ranaut-tejas-teaser
Tejas Teaser : “भारत को छेडोगे तो…” कंगना रणौतच्या बहुचर्चित ‘तेजस’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित
2018 movie entry in oscar award
ऑस्करसाठी भारताकडून ‘२०१८ : एव्हरीवन इज अ हिरो’
mission-raniganj-trailer
Mission Raniganj Trailer: खाणीत अडकलेल्या ६५ मजूरांना वाचवणाऱ्या इंजिनियरची कहाणी; अक्षय कुमारच्या ‘मिशन राणीगंज’चा ट्रेलर प्रदर्शित

आणखी वाचा – आमिरच्या ‘त्या’ वादग्रस्त जाहिरातीवर मध्यप्रदेशचे गृहमंत्री भडकले; म्हणाले, “कोणाच्याही धार्मिक भावनांना…”

नेटफ्लिक्सच्या ट्विटर हँडलवर “तू आधीपासूनच आमच्या हृद्यावर राज्य करत आहेस, तुला प्रेम मिळवण्यासाठी पंजाची गरज नाही हे राजकुमार रावला कोणीतरी जाऊन सांगा”, असे ट्वीट केले आहे. या ट्वीटसह चित्रपटाचे नवे पोस्टर जोडले आहे. पोस्टरमध्ये राजकुमार राव एका मशीनच्या दोन पंजाच्या मधल्या जागेत अडकला आहे असे दिसते. या चित्रपटामध्ये तो मॅकेनिकल इंजिनिअरच्या भूमिकेमध्ये आहे. हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे असेही पोस्टरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 4 : “लाज बाळगा” टास्कदरम्यान किरण मानेंची जीभ घसरली, ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांमध्ये तुफान राडा

या चित्रपटानंतर त्याचे ‘भीड’ आणि ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही’ असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच त्याची ‘गन्स अ‍ॅन्ड गुलाब’ ही वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये त्याने दाक्षिणात्य सुपरस्टार दुलकर सलमानसह काम केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rajkummar rao huma qureshi radhika apte starer monica o my darling to premiere on november 11 yps

First published on: 12-10-2022 at 17:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×