Raakasa movie OTT release date : असे अनेक चित्रपट आहेत जे बॉक्स ऑफिसवर जेवढे पाहिले जातात त्याहीपेक्षा अधिक प्रतिसाद त्यांना ओटीटीवर रिलीज झाल्यानतंर मिळतो. अशातच आता नुकताच एक चित्रपट थिएटरनंतर ओटीटीवर येणार आहे. हा एक हॉरर चित्रपट आहे.
संगीत शोभन आणि नयन सारिका यांच्या प्रमुख भूमिका असलेला हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘राकासा’ ३ एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. मानसा शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट आता डिजिटल डेब्यूसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे राकासा हा चित्रपट आता ओटीटीवर कधी व कुठे पाहता येईल याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
काय आहा ‘राकासा’ची कथा?
‘राकासा’ची कथा वीरू नावाच्या तरुणाभोवती फिरते. वीरू अमेरिकेतून आपल्या गावी परततो आणि बालमैत्रिणीबरोबर लग्न करण्याचा विचार करतो. पण त्याला कळतं की, त्याची प्रेयसी दुसऱ्याच व्यक्तीबरोबर लग्न करणार आहे. त्यामुळे त्याची सर्व स्वप्नं तुटतात
लग्न थांबवण्यासाठी वीरू अनेकदा प्रयत्न करतो, पण प्रत्येक वेळी त्याला अपयशच येतं. निराश होऊन तो एका जुन्या किल्ल्याजवळ जाऊन झोपतो. त्या किल्ल्याबद्दल तिथे भुतांचा वावर असल्याची चर्चा असते. त्या रात्री नेमकं काय घडतं आणि वीरूला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, हीच या फँटसी हॉरर-कॉमेडी चित्रपटाची कथा आहे.
‘राकासा’ OTT रिलीज डेट
रिपोर्ट्सनुसार, संगीत शोभन स्टारर ‘राकासा’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची लिस्टिंग सध्या प्लॅटफॉर्मवरही दिसत आहे. मूळ भाषेसह हा चित्रपट तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही रिलीज होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटात संगीत शोभन मुख्य भूमिकेत दिसत आहेत. त्यांच्याबरोबर नयन सारिका हिने प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.
याशिवाय चित्रपटात अनेक दमदार कलाकारांनीही काम केलं आहे. वेनेला किशोर, ब्रह्माजी, तनिकेला भरणी, गेटअप श्रीनू, आशीष विद्यार्थी आणि राजशेखर अनिंगी यांनी या चित्रपटात प्रभावी अभिनय केला आहे. मनसा शर्मा दिग्दर्शित ‘राकासा’ या चित्रपटाची निर्मिती निहारिका कोनिडेला यांनी ‘पिंक एलिफेंट पिक्चर्स’ बॅनरखाली केली आहे. तर उमेश कुमार बंसल यांनी सहनिर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे.
