दाक्षिणात्य कलाकार आणि त्यांच्या चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ असते. सध्याच्या घडीला दाक्षिणात्य इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत जे येत्या काळात बिग बजेट चित्रपटांमधून झळकणार आहेत. यापैकीच एक म्हणजे राम चरण. आज अभिनेत्याचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टरही लाँच झालं आहे.

दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता राम चरणचा आज ४१वा वाढदिवस आहे आणि या निमित्तानंच त्याच्या ‘पेड्डी’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून यामधून त्याचा चित्रपटातील लूक समोर आला आहे. या पोस्टरवर त्याच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असून येत्या ३० एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यापूर्वीसुद्धा राम चरणनं काही बिग बजेट चित्रपटांत काम केलं आहे, तर त्यानं अनेक हिट चित्रपटसुद्धा दिले आहेत.

ओटीटीवर पाहा राम चरणचे ‘हे’ चित्रपट

राम चरणच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या त्याच्या चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. यामध्ये ‘आरआरआर’, ‘येवडू’, ‘ध्रुव’ अशा चित्रपटांचा समावेश आहे. हे चित्रपट ओटीटीवर तुम्ही घरबसल्या पाहू शकता.

Award Banner

आरआरआर – राजामौली लिखित व दिग्दर्शित ‘आरआरआर’ या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. यामध्ये राम चरणनं आंध्र प्रदेशमधील एका क्रांतिकारकाची भूमिका साकारली आहे, जो ब्रिटिशांच्या विरोधात असतो. हा चित्रपट तुम्ही ओटीटीवर झी ५ आणि नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

मगधीरा – हा एक रोमँटिक चित्रपट आहे. यामध्ये त्यानं एका स्ट्रीट बाईक रायडरची भूमिका साकारली आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, जिओ हॉटस्टार आणि एमएक्स प्लेअरवर हा चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

रंगस्थळम – हा चित्रपट राम चरणच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात त्यानं तरुणाची भूमिका साकारली आहे, जो कायम खूप आनंदी असतो आणि त्याच्या भावाचं रक्षण करण्यासाठी एका राजकीय शत्रूला सामोरा जातो. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि जिओ हॉटस्टारवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

येवडू – या चित्रपटात राम चरणनं चरण व सत्या या दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. त्याच्यासह या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री श्रुती हासनसुद्धा आहे. हा चित्रपट ओटीटीवर अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, जिओ हॉट स्टारवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

ध्रुव – ‘ध्रुव’ हा राम चरणच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये त्यानं एसीपी ध्रुवची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट जिओ हॉट स्टारवर पाहण्यासाठी उपलदाक्षिणात्य कलाकार आणि त्यांच्या चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ असते. सध्याच्या घडीला दाक्षिणात्य इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत जे येत्या काळात बिग बजेट चित्रपटांमधून झळकणार आहेत. यापैकीच एक म्हणजे राम चरण. आज अभिनेत्याचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टरही लाँच झालं आहे.