Watch This Thriller Movie On OTT : ओटीटी प्रेमींना थ्रिलर या घटनेचे चित्रपट पाहायला अधिक आवडतात. त्यामुळे ओटीडी वरील विविध प्लॅटफॉर्मवर त्या अशा धाटणीच्या चित्रपटांच्या आणि सीरिजच्या शोधात असतात. सध्या तर ओटीडीवर पाहण्यासाठी एकापेक्षा एक असे थ्रिलर, क्राईम, रहस्य अशा धाटणीचे चित्रपट आणि सिरीज उपलब्ध आहेत.

तुम्हालासुद्धा जर घरबसल्या ओटीटीवर काहीतरी रंजक आणि थरारक पाहायचं असेल तर आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहो जो तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. यामध्ये दहशत, खून, चातुर्य आणि थ्रिलर अशा गोष्टी पाहायला मिळतात. हा चित्रपट कोणता आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

ओटीटीवरील ‘हा’ थ्रिलर चित्रपट पाहिलात का?

सस्पेन्सच्या बाबतीत हा १२७ मिनिटांचा थ्रिलर चित्रपट अजय देवगन च्या दृश्यमलासुद्धा मागे टाकतो. महत्त्वाचं म्हणजे आयएमडीबीवर सुद्धा या चित्रपटाला चांगले रेटिंग आहेत. २०१६ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात मुंबईतील एका सिरीयल किलर ची गोष्ट पाहायला मिळते. राम राघवन असं त्या व्यक्तीचं नाव असून त्याने जवळपास ४० खून केलेले असतात. या चित्रपटाचं नाव आहे ‘रमन राघव 2.0’

‘रमन राघव 2.0’ या चित्रपटाचा कास्ट बद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत विविध कथानक असलेल्या चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे लोकप्रिय अभिनेते नवाजुद्दीन सिद्दिकी मुख्य भूमिकेत आहेत. आणि खास गोष्ट म्हणजे या चित्रपटांमध्ये बॉलिवूड अभिनेता विकी कौशलनेसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. रेटिंग बद्दल बोलायचं झालं तर IMDBने या चित्रपटाला ७.३ इतका रेटिंग दिलं आहे.

त्यामुळे थरार, दहशत, गुन्हेगारी अशा गोष्टी असलेला हा थ्रिलर चित्रपट जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर आता घरबसल्या ओटीडीवर हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकता. ओटीटी वरील लोकप्रिय प्लॅटफॉर्म झी ५ वर हा चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध आहे. चित्रपटाबद्दलची अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे झी ५ वरील मस्ट वॉच चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश झाला आहे. त्यामुळे घरबसल्या सुट्टीच्या दिवशी जर काहीतरी थरारक आणि रंजक पाहण्याची इच्छा असेल तर हा चित्रपट एक चांगला पर्याय ठरू शकतो.

दरम्यान, ‘रमन राघव 2.0’ या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर अनुराग कश्यप लिखित आणि विक्रमादित्य मोटवानी निर्मित दहा कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिस वर मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता आणि हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.