ओटीटी विश्वात नवनवीन वेबसीरिज, चित्रपट येत असतात. चित्रपटगृहांपेक्षा आता प्रेक्षकांचा कल ओटीटीकडे वाढत चालला आहे. नेटफ्लिक्ससारख्या माध्यमावर जगभरातील कन्टेन्ट बघायला मिळतो. आता ओटीटीच्या स्पर्धेत मराठी चित्रपटसृष्टी मागे नाही, मराठीतला पहिला ओटीटी प्लॅटफॉर्म, प्लॅनेट मराठी आता एक नवीन वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. ‘अथांग’ असं या वेबसीरिज नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता विक्रम गायकवाड यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या वेबसीरिजबद्दल माहिती दिली आहे. ‘दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर घेऊन येत आहोत अथांगची पहिली झलक’ असा कॅप्शन दिला आहे. तसेच या वेबसीरिजचे पोस्टरदेखील पोस्ट केले आहे. महिलेच्या पायातून रक्त वाहत आहे असे पोस्टर आहे. या पोस्टवरून ही वेबसीरिज सस्पेन्स थ्रिलर असणार शक्यता वर्तवली जात आहे. या वेबसीरिजची प्रस्तुती प्लॅनेट मराठीचे सर्वेसर्वा अक्षय विलास बर्दापूरकर यांनी केली आहे. संतोष खेर, तेजस्विनी पंडित यांनी निर्मिती केली आहे तर जयंत पवार यांनी दिग्दर्शन केले आहे.

भाभीजी घर पर हैं’ मालिकेतील कलाकारांनी प्रसिद्ध अशा रामलीला कार्यक्रमाला लावली हजेरी

प्लॅनेट मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी कायमच वेगवेगळ्या कलाकृती घेऊन येत असतात. ‘रानबाझार’ या वेबसीरीजने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते, ही वेबसीरीज चांगलीच गाजली होती. अभिनेत्री क्रांती रेडकर तिच्या निर्मिती संस्थेद्वारे एका रिॲलिटी शोची प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या बरोबरीने निर्मिती करणार आहे. तसेच “मोगलमर्दीनी छत्रपती ताराराणी” ऐतिहासिक चित्रपटदेखील प्लॅनेट मराठी लवकरच आपल्या भेटीस येणार आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नाचा सोहळा नुकताच या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. अशा पद्धतीचा लग्नसोहळा पहिल्यांदाच ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. सोनाली कुलकर्णीने आपल्या जवळच्या नातेवाईक, मित्रमैत्रिणीबरोबर सोहळा लंडनमध्ये पार पाडला होता. तो सोहळा प्रेक्षकांना बघता यावा म्हणून प्लॅनेट मराठीवर प्रदर्शित करण्यात आला.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbaazar actress tejaswini pandit producing new marathi webseries athang which is release on plane marathi spg
First published on: 05-10-2022 at 09:00 IST