रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर स्टारर ‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित होऊन दोन महिने झाल्यानंतर तो ओटीटीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. लव रंजन दिग्दर्शित हा चित्रपट ३ मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. याची माहिती नेटफ्लिक्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देण्यात आली आहे.

हेही वाचा – Video: पुण्यातील शो पोलिसांनी बंद पाडल्यानंतर ए. आर. रेहमान यांनी शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “आपण सर्वांनी स्टेजवर…”

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपट ३ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाईल. रणबीर व श्रद्धाच्या चाहत्यांना हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. ‘हे खोटं नाही, तुम्हाला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे,’ असं ट्वीटमध्ये म्हटलंय. चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल बोलताना रणबीर कपूर म्हणाला, “तू झुठी मैं मक्कार’ आता जगभरातील चाहत्यांसाठी उपलब्ध होईल. मी खूप उत्सुक आहे. आम्हाला सिनेमागृहांमध्ये मिळालेल्या प्रतिसादानंतर जगभरातील इतक्या देशांमध्ये आमची मेहनत दाखवण्यास आम्ही उत्साहित आहोत.”

श्रद्धा कपूर म्हणाली, “तू झुठी मैं मक्कार’ हा चित्रपट मित्र आणि कुटुंबियांबरोबर पाहण्यासारखा चित्रपट आहे आणि आता दर्शक घरबसल्या हा चित्रपट पाहू शकतात. आमचा चित्रपट जगभरातील प्रेक्षक बघणार आहेत, यासाठी आमची टीम खूप उत्सुक आहे.” दरम्यान, ‘तू झुठी मैं मक्कार’ चित्रपट ८ मार्च २०२३ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाने आजपर्यंत १४८.७३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर येण्यास सज्ज झाला असून उद्यापासून तो प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येईल.