ओटीटीमुळे घर बसल्या मनोरंजनासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. जगभरातील चित्रपट, सिनेमे, वेब सीरिज तुम्ही तुमच्या फोनमध्ये पाहू शकता. नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ, हॉटस्टार, झी 5, सोनी लिव्ह यासारख्या विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनासाठी वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट उपलब्ध आहे. पण असे काही चित्रपट आहेत जे आपण आपल्या कुटुंबासह पाहू शकत नाही. यामध्ये बोल्ड संवाद व सीन आहेत. तुम्ही कुटुंबासोबत राहत असाल तर हे चित्रपट हेडफोन लावल्याशिवाय तुम्ही पाहू शकत नाही. साहब बीवी और गँगस्टर २०११ साली आलेला रणदीप हुड्डा, जिमी शेरगिल व माही गिल यांचा 'साहब बीवी और गँगस्टर' या चित्रपटात खूप बोल्ड सीन्स आहेत. माही गिलने दोन्ही कलाकारांसोबत अनेक इंटिमेट सीन्स दिले आहेत. हा चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध आहे. धाडस असेल तरच पाहा मन हेलावणारे OTT वरील ‘हे’ तीन चित्रपट, एकावर घालण्यात आली होती बंदी! अनारकली ऑफ आरा स्वरा भास्करचा 'अनारकली ऑफ आरा' हा एक वादग्रस्त चित्रपट राहिला आहे. या चित्रपटातील व्हिडीओ व फोटोंमुळेही बराच वाद निर्माण झाला होता. या चित्रपटात स्वरा भास्करचा कपडे बदलताना एक सीन आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी व संजय मिश्रा हे कलाकारही होते. बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी रंग रसिया हा रणदीप हुडाचा चित्रपट आहे, ज्यामध्ये त्याने अनेक इंटिमेट सीन्स दिले आहेत. यात त्याच्याबरोबर नंदना सेन मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट झी 5 वर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. यात रणदीपने राजा रवी वर्माची तर नंदनाने सुगंधा नावाची भूमिका केली होती. वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos लिपस्टिक अंडर माय बुरखा रत्ना पाठक, कोंकणा सेन शर्मा, अहाना कुमरा, विक्रांत मॅस्सी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा चित्रपट २०१७ मध्ये आला होता. या चित्रपटात अनेक महिलांच्या कथा दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटातील अनेक बोल्ड संवाद व दृश्ये आहेत. हा चित्रपट प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. श्वेता बच्चनच्या लेकीचं ब्रेकअप? ‘या’ बॉलीवूड अभिनेत्याला डेट करत होती नव्या नवेली नंदा बाबुमोशाय बंदूकबाज 'बाबूमोशाय बंदूकबाज' या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी व अभिनेत्री बबिता बाग यांचे अनेक इंटिमेट सीन्स आहेत. हा चित्रपट तुम्ही कुटुंबाबरोबर बसून पाहू शकत नाही. हा चित्रपट झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.