ZEE5 Crime Thriller Web Series Rangbaaz Season 3: तुम्हाला जर क्राईम थ्रिलर सीरिज आणि अंडरवर्ल्डच्या कथानकावर आधारित चित्रपट पाहायला आवडत असतील, तर ओटीटीवर सध्या एका जबरदस्त सीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय राजकारण आणि गुन्हेगारी जगताचा थरार दाखवणारी ‘रंगबाज’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. ZEE5 ची ही सर्वाधिक लोकप्रिय मालिका असून याचे आतापर्यंत आलेले तिन्ही सीझन हिट ठरले आहेत.

‘रंगबाज’ ही एक उत्तम क्राइम थ्रिलर सीरिज आहे. यामध्ये भारतीय राजकारण आणि अंडरवर्ल्डचे जग दाखवण्यात आले आहे. प्रत्येक सीझनची गोष्ट वेगळी आहे. या सीरिजचा पहिला सीझन इतका धमाकेदार होता की याचे पुढे ३ सीझन आले आणि ते सगळे सीझन गाजले.

रंगबाज सीरिजचा पहिला सीझन

१९९० च्या काळातील उत्तर प्रदेशमधील गोरखपुर येथील कुख्यात गँगस्टर शिवप्रकाश शुक्ला याच्या आयुष्यावर आधारित पहिला सीझन आहे.

रंगबाजचा दुसरा सीझन

हा सीझन एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. यामध्ये जिमी शेरगिलने ‘अमरपाल सिंह’ची भूमिका साकारली आहे. एक हुशार तरुण राजस्थानचे राजकारण, वैयक्तिक शत्रुत्व आणि गुन्हेगारीच्या जगात ओढला जातो आणि मग गँगस्टर बनतो, हे यात दाखवण्यात आलंय.

रंगबाजचा तिसरा सीझन

या सीझनमध्ये हरूम शाह अली बैगची गोष्ट दाखवण्यात आली आहे. तो सुरुवातीला लहान गुन्हेगार असतो आणि नंतर गँगस्टर बनतो. पुढे तो राजकारणातही जातो. ही सीरिज दिवंगत बाहुबली नेता मोहम्मद शहाबुद्दीनच्या आयुष्यावरून प्रेरित आहे, असं म्हटलं जातं. यात छावा फेम विनीत कुमार सिंहने मुख्य भूमिका साकारली आहे.

रंगबाज सीरिज कुठे पाहायची?

रंगबाज सीरिजचे तिन्ही सीझन जबरदस्त आहेत. या वीकेंडला तुमचा काहीच प्लॅन नसेल तर रंगबाज सीरिज तुम्ही झी5 वर पाहू शकता. रंगबाज ३ ला आयएमडीबीवर ७.७ रेटिंग मिळाले आहे. तिसऱ्या सीझनमध्ये विनीत सिंह, आकांक्षा सिंह, मराठमोळ्या गीतांजली कुलकर्णी, राजेश तेलंग या उत्तम कलाकारांची फौज आहे. सर्वांनी आपापल्या भूमिका उत्कृष्टपणे साकारल्या आहेत. विशेष म्हणजे ही झी5 ची सर्वात लोकप्रिय व यशस्वी सीरिज आहे.

रंगबाज इतकी लोकप्रिय झाली आहे की आता चाहते चौथ्या सीझनची वाट पाहत आहेत. मात्र अद्याप निर्मात्यांनी चौथ्या सीझनची घोषणा केलेली नाही.