Mardaani 3 OTT Release Update : बॉलीवूडची दमदार अभिनेत्री राणी मुखर्जी अलीकडच्या काळात मोजकेच चित्रपट करतेय. पण तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतात. राणीचे चित्रपट सामाजिक समस्यांवर भाष्य करणारे, वास्तववादी वाटणारे असतात. जेव्हा राणीच्या हिट चित्रपटांचा उल्लेख केला जातो तेव्हा मर्दानीचा उल्लेख नक्की होतो. या चित्रपटाचा तिसरा भाग अर्थातच मर्दानी ३ शुक्रवारी, ३० जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यापूर्वी मर्दानी आणि मर्दानी २ ला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले होते.
बॉर्डर २ बॉक्स ऑफिसवर दमदार कलेक्शन करत आहे. याचदरम्यान मर्दानी ३ मोठ्या पडद्यावर रिलीज झाला आहे. चित्रपटसृष्टीत ३० वर्षे पूर्ण करणाऱ्या राणी मुखर्जीचा मर्दानी ३ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होताच, त्याच्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी अपडेट आली आहे. मर्दानी २ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार, ते जाणून घेऊयात.
काहींना चित्रपट थिएटरमध्ये पाहायला आवडतात, तर काही जण चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची वाट पाहतात. तुम्ही राणी मुखर्जीचे चाहते असाल, मर्दानी व मर्दानी २ तुम्हाला खूप आवडले असतील आणि मर्दानी ३ तुम्हाला घरबसल्या पाहायचा असेल, तर तो कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल ते जाणून घ्या.
मर्दानी 3 कुठे रिलीज होणार?
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या राणी मुखर्जीच्या मर्दानी ३ ला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ३.८५ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. तो कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल, त्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.
राणी मुखर्जीचा ‘मर्दानी ३’ हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पण, निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही. राणी या चित्रपटात पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत आहे. राणीला पुन्हा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहून चाहते खूप आनंदी झाले आहेत. राणी मुखर्जीचा ‘मर्दानी ३’ नेटफ्लिक्सवर कधी रिलीज होईल, यासाठी निर्मात्यांच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागेल. तोपर्यंत तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकता.

