Rashmika Mandanna OTT Release: ओटीटी असे माध्यम आहे, ज्यावर प्रेक्षक कधीही व कुठेही त्यांचा आवडता कंटेट पाहू शकतात. जगभरातील विविध भाषांतील व विविध जॉनरमधील कंटेट त्यांना पाहता येतो.

याबरोबरच, अलीकडे थिएटरमध्ये प्रदर्शित झालेले सिनेमेदेखील काही दिवसानंतर विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात. तसेच, ओटीटीवर सतत नवनवीन वेब सीरिज प्रदर्शित होतात. त्यामुळे अलीकडे ओटीटी प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसत आहे.

रश्मिका मंदानाचे ‘हे’ दोन सिनेमे नेटफ्लिक्सवर पाहता येणार

आता रश्मिका मंदानाचे दोन चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. हे चित्रपट कोणते हे जाणून घेऊ…

Award Banner

रश्मिका मंदाना लवकरच ‘मैसा’ व ‘रणबाली’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या दोन्ही चित्रपटांचे ओटीटीचे हक्क नेटफ्लिक्सने खरेदी केले आहेत.

नुकताच मैसा या सिनेमाचा पहिला लूक समोर आला आहे. यावेळी चित्रपटाचे डिजिटल पार्टनर कोण आहेत, याचाही खुलासा झाला. १२३ तेलुगु रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सने सिनेमाचे ओटीटीचे हक्क खरेदी केले आहेत. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे.

मैसा या सिनेमानंतर रश्मिका मंदाना रणबाली या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटाचे ओटीटीचे अधिकारसुद्धा नेटफ्लिक्सकडेच आहेत. असे म्हटले जात आहे की, नेटफ्लिक्स व चित्रपटांचे निर्माते यांच्यात करार झाला आहे. दोन्ही चित्रपटांचे स्ट्रीमिंग हक्क कोट्यवधी रुपयांना विकले गेले आहेत.

‘मैसा’ सिनेमाचे दिग्दर्शन रवींद्र पुल्ले यांनी केले आहे. हा एक अॅक्शन सिनेमा आहे. हा चित्रपट या २०२६ च्या शेवटी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तर, रणबाली सिनेमाबद्दलही प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे पोस्टर समोर आले होते. त्यावरील विजय देवरकोंडा व रश्मिका मंदाना यांच्या लूकने लक्ष वेधले होते. लग्नानंतरचा त्यांचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे. हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२६ ला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मैसा व रणबाली या सिनेमांबरोबरच अभिनेत्री कॉकटेल २ या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात तिच्याबरोबर क्रिती सेनॉन व शाहिद कपूर प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत.

दरम्यान, रश्मिका मंदानाच्या आगामी चित्रपटांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.