Laapataa Ladies : किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. प्रत्येकाच्या मनात या चित्रपटाच्या कथेने आणि कलाकारांनी घर निर्माण केलं आहे. हा चित्रपट ऑस्कर २०२५ च्या शर्यतीतसुद्धा पोहचला आहे, त्यामुळे आता किरण राव आणि आमिर खानने आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करायचे असे ठरवले; त्यासाठी त्यांनी चित्रपटाचं थेट नाव बदललं आहे. ‘लापता लेडीज’ नाही तर दुसऱ्याच नावाने चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. किरण रावने या चित्रपटाचं नेमकं काय नाव ठेवलंय त्याचीच माहिती जाणून घेऊ.

किरण राव आणि आमिर खानने या चित्रपटाचं नाव ‘लापता लेडीज’ऐवजी ‘लॉस्ट लेडीज’ असं ठेवलं आहे. ‘लॉस्ट लेडीज’ नाव असलेलं चित्रपटाचं पोस्टरदेखील इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आलं आहे. आता हे पोस्टर जोरदार व्हायरल होत आहे.
आमिर खान प्रोडक्शनकडून इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. तसेच यावर कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “प्रतीक्षा संपली! ‘लॉस्ट लेडीज’ अधिकृत पोस्टर सादर झाले आहे. फूल आणि जयाच्या सुंदर प्रवासाची एक झलक.” तसेच शेवटी पोस्टर बनवणाऱ्या व्यक्तींचे आभारसुद्धा व्यक्त केले आहेत.

ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”
niti taylor breks silence on her divorce
प्रसिद्ध अभिनेत्रीने हटवलं पतीचं आडनाव, घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच सोडलं मौन; म्हणाली…
Marathi actor Chinmay Mandlekar praise of nivedita saraf
“जितकं आपण या अभिनेत्रीला…”, चिन्मय मांडलेकरने निवेदिता सराफांचं भरभरून कौतुक करत केली खंत व्यक्त, म्हणाला…
Marathi Actor Sourabh Chougule Post
शाहरुखच्या मुलांची नावं ठळक अक्षरात, तर मराठी कलाकारांना…; ‘ते’ पोस्टर पाहून सौरभ चौघुलेचा सवाल, म्हणाला…
Abhishek Gaonkar and Sonalee Gurav Wedding
Video : कोकणात पार पडला मराठी अभिनेत्याचा विवाहसोहळा! लग्नानंतर पत्नीचं बदललं नाव…; उखाणा घेत म्हणाला…
Aditya Pancholi daughter was replaced by Kangana Ranaut in her debut film
कंगना रणौतने एक्स बॉयफ्रेंडच्या मुलीला पहिल्याच चित्रपटात केलेलं रिप्लेस; झरीना वहाबचा मोठा खुलासा, म्हणाली…


हेही वाचा : “स्वतःचं घरदार आणि संसार सांभाळून…”, प्रवीण तरडेंची पत्नी स्नेहलसाठी खास पोस्ट! मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या भावना

न्यूयॉर्कमध्ये ‘लॉस्ट लेडीज’ चित्रपटाची स्क्रीनिंग

शेफ विकास खन्ना यांनी न्यूयॉर्कमध्ये ‘लॉस्ट लेडीज’च्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर स्क्रीनिंगचे काही फोटो पोस्ट केले आणि लिहिलं की, “जेव्हा हृदयापासून प्रार्थना होते, तेव्हा मन जिंकल्यासारखं वाटतं. जेव्हा मी या चित्रपटासाठी स्क्रीनिंगचं आयोजन केलं, तेव्हा मलादेखील असंच वाटलं. किरण तू एक खरी कलाकार आहेस, असं म्हणत त्यांनी किरणसह पुढे आमिर खानचे देखील कौतुक केले.”

हेही वाचा : नो अल्कोहोल, ८ तास झोप अन्…; मलायका अरोराने नोव्हेंबर महिन्यात स्वीकारली ‘ही’ आव्हाने, पोस्ट होतेय व्हायरल

u

‘लॉस्ट लेडीज’ चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रंता आणि स्पर्श श्रीवास्तव यांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच या चित्रपटात छाया कदम, सतेंद्र सोनी, रवी किशन आणि गीता अग्रवाल शर्मा यांनीदेखील महत्त्वाची पात्रे साकारली आहेत.

Story img Loader