Rishi Kapoor Best Movies on OTT: ऋषी कपूर यांचे बॉलीवूडमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. आजही त्यांच्या अभिनयाबद्दल, त्यांच्या भूमिकांबद्दल आणि त्यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटांबद्दल मोठ्या प्रमाणात बोलले जाते. याबरोबरच रणबीर कपूर, नीता कपूर, रिद्धीमा कपूर यांच्यामुळेदेखील अनेकदा ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. ३० एप्रिल २०२० ला ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. आज त्यांच्या निधनाला ६ वर्षे झाली आहेत. या निमित्ताने त्यांच्या अशा गाजलेल्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊ, जे ओटीटीवर पाहता येतील.

१. बॉबी

बॉबी या सिनेमातून नायक म्हणून ऋषी कपूर यांनी १९७३ ला बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. राज कपूर दिग्दर्शित या चित्रपटात डिंपल कपाडिया, प्रेम चोप्रा आणि दुर्गा खोटे यांच्याही भूमिका होत्या. हा चित्रपट ZEE5 आणि ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

२. अमर अकबर अँथनी

‘अमर अकबर अँथनी’ हा सिनेमा १९९७ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. चित्रपटात ऋषी कपूर यांच्याबरोबर अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, नीतू सिंग आणि परवीन बाबी यांसारखे बॉलीवूडचे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. मनमोहन देसाई दिग्दर्शित हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.

३. हम किसी से कम नहीं

हम किसी से कम नहीं हा ऋषी कपूर यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. २५ ऑगस्ट १९७७ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात काजल किरण, तारिक आणि झीनत अमान यांनी भूमिका साकारल्या होत्या. नासिर हुसैन दिग्दर्शित हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.

४. सरगम

ऋषी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला सरगम हा सिनेमा १९६९ ला प्रदर्शित झाला होता. समीक्षकांकडून सिनेमाचे कौतुक झाले होते. हा सिनेमा सध्या ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

५. नसीब

नसीब हा सिनेमा ५ जानेवारी १९८१ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा, रीना रॉय, कादर खान आणि प्राण हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले होते. हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ, झी ५ आणि नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

६. प्रेम रोग

१९८२ ला प्रदर्शित झालेल्या प्रेम रोग या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. यामध्ये ऋषी कपूर यांच्याबरोबर पद्मिनी कोल्हापुरे प्रमुख भूमिकेत होत्या. हा सिनेमा झी ५ व अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

७. कुली

कुली या सिनेमात अमिताभ बच्चन व ऋषी कपूर प्रमुख भूमिकेत होते. तुम्हाला हा सिनेमा पाहायचा असेल तर झी ५ व अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा उपलब्ध आहे.

८. नगीना

ऋषी कपूर व श्रीदेवी यांची प्रमुख भूमिका असलेला नगीना हा सिनेमा १९८६ ला प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अमरीश पुरीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहता येतो.

९. दीवाना

ऋषी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला दीवाना हा सिनेमा १९९५ ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दिव्या भारती आणि शाहरुख खान प्रमुख भूमिकेत दिसले होते. हा सिनेमा नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

१०. दामिनी

दामिनी हा सिनेमा १९९३ ला प्रदर्शित झाला होता. राजकुमार संतोषी दिग्दर्शित या चित्रपटात अमरीश पुरी, परेश रावल महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहता येतो.