शाहरुख खान आणि दीपिका पदूकोणचा ‘पठाण’ हा चित्रपट सुपरहीट ठरला. वेगवेगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले. हा चित्रपट यश चोप्रा यांच्या ‘यश राज फिल्म्स’ या बॅनरखाली बनला असून ‘यश राज’च्या गेल्या काही वर्षांतील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ज्या यश चोप्रा यांनी ‘यश राज फिल्म्स’ची सुरुवात केली त्यांच्यावर बेतलेला एक माहितीपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

‘फादर ऑफ रोमान्स’ अशी ओळख असणाऱ्या यश चोप्रा यांच्यावर बेतलेल्या ‘द रोमॅंटिक्स’ या डॉक्युमेंट्री सीरिजमध्ये यश चोप्रा यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायला मिळणार आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांचं नाव कसं मोठं झालं? शिवाय त्यांना फादर ऑफ रोमान्स का म्हंटलं जातं यामागील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार. शिवाय त्यांचा चित्रपटक्षेत्रातील प्रवास आणि त्यांचे चित्रपटाप्रती असलेले प्रेम याबद्दलही बऱ्याच गोष्टींचा खुलासा होणार आहे.

shehzad-khan-speaks-about-ajit
“माझे वडील गटारात झोपायचे…”, बॉलिवूडचा कपटी खलनायक अजित यांच्या मुलाचा मोठा खुलासा
marathi actress Amruta Subhash and sandesh kulkarni Love story Entdc
पहिल्या भेटीतलं प्रेम, १७व्या वर्षी लग्नाची मागणी अन् मूल होऊ न देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची फिल्मी लव्हस्टोरी
Sangeet Natak Academy Award announced to veteran actor Ashok Saraf for his performance in the field of theatre
नाट्य क्षेत्रातील कामगिरीसाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर
tigmanshu-dhulia-vivek-agnihotri
“असे चित्रपट अत्यंत बेकार…”, तिग्मांशु धुलिया यांची विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’वर टीका

आणखी वाचा : पाकिस्तानी टेलिव्हिजन मालिकांचं विवेक अग्निहोत्रींनी केलं कौतुक; म्हणाले “त्यांच्यासारखं नाट्य…”

या सीरिजमध्ये बॉलिवूडमधील बडेबडे कलाकार यश चोप्रा यांच्या कार्याबद्दल बोलणार असून त्यांच्या आठवणींना उजाळा देताना आपल्याला दिसणार आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, करण जोहर, अनिल कपूर माधुरी दीक्षित, राणी मुखर्जीपासून रणवीर सिंग, भूमी पेडणेकरसारखे कित्येक बॉलिवूड कलाकार या सीरिजमध्ये दिसणार आहेत आणि यश चोप्रा यांच्याबद्दल कित्येक खास गोष्टी शेअर करणार आहेत. याच सीरिजमध्ये दिवंगत बॉलिवूड अभिनेते ऋषि कपूर यांचीही झलक पाहायला मिळणार आहे.

‘इ-टाइम्स’च्या वृत्तानुसार या सीरिजची दिग्दर्शिका स्मृति मुंध्रा हिला दिलेली ऋषि कपूर यांची ही शेवटची मुलाखत. या सीरिजमध्ये ऋषि कपूर आणि पत्नी नितू कपूर हे यश चोप्रा यांच्याविषयी बरंच भरभरून बोलले, त्यांचा पहिला रोमॅंटिक सुपरहीट चित्रपट ‘चाँदनी’ बद्दलही ऋषि कपूर मानमोकळेपणे बोलले. या सीरिजसाठी दिलेल्या मुलाखतीमध्ये स्मृति मुंध्राशी संवाद साधतांना ऋषि कपूर चित्रपटांबद्दल एक वाक्य म्हणाले, ते म्हणजे “सेक्सनंतर चित्रपट हे एकमेव मनोरंजनाचं उत्तम माध्यम आहे.” ऋषि कपूर यांच्यासह आणखीही बऱ्याच कलाकारांनी यश चोप्रा यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केलं आहे. ही सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.