Rubab OTT Release: थिएटरमध्ये प्रदर्शित झालेले सिनेमे जेव्हा ओटीटीवर प्रदर्शित होतात, त्यावेळी तो सिनेमा प्रेक्षक त्यांच्या वेळेनुसार कधीही पाहू शकतात. अनेकदा प्रेक्षक अपेक्षित सिनेमा ओटीटीवर कधी येतो, याची वाट पाहत असतात.

काही वेळा थिएटरमध्ये फ्लॉप झालेले सिनेमे ओटीटीवर ट्रेंड होताना दिसतात. त्यामुळे ते चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत येतात. मग त्यातील कलाकारांचीही चर्चा होताना दिसते.

दर आठवड्याला अनेक मराठी, हिंदी, तेलुगू, तमीळ, कन्नड अशा विविध भाषांतील सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात. क्राईम, थ्रिलर, कॉमेडी, रोमँटिक अशा विविध जॉनरमधील चित्रपट, वेब सीरिज, मायक्रो सीरिज प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येतात. जगभरातील विविध कंटेंट प्रेक्षकांना घरबसल्याची पाहण्याची संधी ओटीटीमुळे मिळाली आहे. त्यामुळे ओटीटी हे लोकप्रिय माध्यम ठरत आहे.

आता एक मराठी सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा कोणता, तो कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे, हे जाणून घेऊ…

“माझं अत्यंत लाडकं काम म्हणजे रुबाब”

या सिनेमाचे नाव रुबाब, असे आहे. या सिनेमात संभाजी ससाणे आणि शीतल पाटील हे कलाकार प्रमुख भूमिकांत आहेत. तसेच, सिमरन खेडेकरदेखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. शेखर बापू रणखंबे यांनी सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाला थिएटरमध्ये प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.

आता अभिनेत्री सिमरन खेडेकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाल्याचे सांगितले आहे. तिने चित्रपटातील कलाकारांबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले, “आमच्या इथे शोच नव्हते, टायमिंगचं मॅनेज नाही झालं, वेळच नव्हता अशा सगळ्या कारणांना आता बगल देता येणार आहे. कारण- आजपासून ‘रुबाब’ झी ५ वर दिसणार आहे. म्हणजे कुठेही आणि कुठल्याही वेळी ‘रुबाब’ बघता येणार आहे.”

पुढे तिने असेही लिहिले, “माझं अत्यंत लाडकं काम म्हणजे रुबाब. कारण- ‘रुबाब’चा टीममधील प्रत्येकानं घरचं कार्य असल्याप्रमाणे अतिशय प्रामाणिकपणे या सिनेमासाठी काम केलं आहे. आता आमचा ‘रुबाब’ तुमचा झाला आहे.”

सिमरनला तिच्या ‘देवमाणूस’मधील भूमिकेमुळे लोकप्रियता मिळाली. तिने मालिकेत आर्या ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती रुबाब या सिनेमात दिसली. आता आगामी काळात ती कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.