Saare Jahan Se Accha Trending on Netflix: ओटीटी प्लॅटफॉर्मवर दररोज आणि दर आठवड्याला नवीन कंटेंट रिलीज होत असतो. मात्र काही कंटेंट असा असतो जो रिलीज होऊन बराच काळ लोटला तरी लोकांना पाहायला आवडतो आणि वारंवार पाहिल्या गेल्यामुळे त्याची रँकिंग सतत टॉप-१० मध्ये राहते. सध्या आपण अशाच एका सीरिजबद्दल जाणून घेणार आहोत, जी सुमारे १२ महिन्यांपूर्वी रिलीज झाली होती पण आजही पाहिली जात आहे. याच कारणामुळे ही सीरिज आजही टॉप-१० मध्ये टिकून आहे. खरं तर रिलीजवेळी या सीरिजची तेवढी चर्चा झाली नव्हती, पण नंतर हळुहळू प्रेक्षकांना ती आवडली आणि आता ती ट्रेंडिंग आहे.

‘सारे जहां से अच्छा: द साइलेंट गार्डियन्स’ ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती आणि रिलीजला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही ट्रेंडिंग लिस्टमध्ये ती टिकून आहे. ‘सारे जहाँ से अच्छा: द सायलेंट गार्डियन्स’ या सीरिजमध्ये प्रतीक गांधी, सनी हिंदुजा, तिलोत्तमा शोम आणि रजत कपूर यांसारखे उत्तम कलाकार आहेत. ही सीरिज १३ ऑगस्ट २०२५ रोजी रिलीज झाली होती. या सीरिजमध्ये ६ एपिसोड्स आहेत. या सीरिजला IMDb वर ७.२/१० इतके उत्तम रेटिंग मिळालेले आहे.

‘सारे जहां से अच्छा: द साइलेंट गार्डियन्स’ची कथा

या सीरिजची कथा १९७० च्या दशकातील सत्य घटनांवर आधारित आहे. त्या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात न्यूक्लियर पॉवर बनण्याची एक गुप्त स्पर्धा सुरू होती. या सीरिजमध्ये एका अत्यंत चलाख आणि निडर भारतीय गुप्तहेराची कथा दाखवण्यात आली आहे. पाकिस्तानचा गुप्त अणुकार्यक्रम उधळून लावणे आणि भारताचे संरक्षण करणे हे या गुप्तहेराचे मुख्य मिशन असते. यासाठी त्याला सीमेपार पाकिस्तानमध्ये जाऊन अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. सीरिजमध्ये देशप्रेम, गुप्तहेरांचे अदृश्य योगदान, धोकादायक मिशन्स आणि १९७० च्या काळातील राजकीय घडामोडींचा अतिशय रोमांचक थरार पाहायला मिळतो.

रिलीजच्या एका वर्षानंतरही ही सीरिज नेटफ्लिक्सच्या टॉप-१० मध्ये टिकून आहे. सध्या ती पाचव्या स्थानावर आहे. नेटफ्लिक्सवरील टॉप-५बद्दल बोलायचं झाल्यास पहिल्या क्रमांकावर ‘ऑपरेशन सफेद सागर’, दुसऱ्या क्रमांकावर ‘मुसाफिर कॅफे’, तिसऱ्या क्रमांकावर ‘स्पुकी इन लव्ह’, चौथ्या क्रमांकावर ‘अवर स्टिकी लव्ह’ आणि पाचव्या क्रमांकावर ‘सारे जहाँ से अच्छा’ ही सीरिज आहे.