‘बिग बॉस ओटीटी’चा पहिला सीझन प्रचंड गाजला होता. त्यामुळेच आता सीझन-२ बाबत चर्चा सुरू झाली आहे. या शोबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. बिग बॉस ओटीटी सीझन-२ सलमान खान होस्ट करणार आहे. बिग बॉस ओटीटीचे पहिले पर्व दिग्दर्शक करण जोहरने होस्ट केले होते. मात्र, आता दुसऱ्या पर्वातून करण जोहरचा पत्ता कट करण्यात आला आहे. ‘बिग बॉस ओटीटी सीझन-२’ मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धेकांची यादी जाहीर झाली आहे.
हेही वाचा- ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, कधी आणि कुठे? जाणून घ्या




बॉलीवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वामध्ये पूनम पांडे, आवेज दरबार, पूजा गोर, अंजली अरोरा, महेश पुजारी, फैसल शेख, संभावना सेठ, अनुराग दावोल इत्यादी कलाकार दिसू शकतात. बिग बॉस OTT 2 च्या या वर्षीच्या संकल्पनेअंतर्गत, घरातील बागेला जंगलाचे रूप देण्यात आले आहे. या सर्व दहा स्पर्धकांना सहा आठवडे या घरात राहावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार बिग बॉस ओटीटी’चे दुसरे पर्व १७ किंवा १८ जूनला Jio Cinemas वर प्रसारित करण्यात येणार आहे. या शोसाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
हेही वाचा- बॉक्स ऑफिसचा ‘दबंग’ झळकणार ओटीटीवर; सैफ व शाहिद पाठोपाठ सलमान खान करणार ओटीटी पदार्पण?
दरम्यान, ‘बिग बॉस ओटीटी’ सीझन-१ मध्ये ‘दिव्या अग्रवाल’ विजयी झाली होती. पहिल्या पर्वात शमिता शेट्टी, राकेश बापट, उर्फी जावेद, जीशान खान, निशांत भट, प्रतीक सेहजपाल आणि नेहा भसीन यांसह एकूण १५ तगडे खेळाडू सहभागी झाले होते.