Samay Raina Kashmiri Pandit Controversy: कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या नव्या एपिसोडमध्ये ऑरी, अर्चना पूरन सिंह आणि शॅरॉन वर्मा पॅनलमध्ये सहभागी झाल्या होत्या. सोशल मीडियावर हा एपिसोड जबरदस्त व्हायरल झाला असून, त्यातील स्पर्धक आणि विनोद प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामध्ये स्टँड-अप कॉमेडियन शॅरॉन वर्माला बिहारी म्हणण्यावरून आणि त्यावर काश्मिरी पंडितांबाबत केलेल्या विनोदावरून समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

समय रैना हा त्याचा हजरजबाबीपणा आणि खास विनोदी शैली यांमुळे नेहमी चर्चेत असतो. मात्र, कधी कधी त्याच्या विनोदातून मर्यादा ओलांडल्या गेल्याचं दिसून येतं. यापूर्वी ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या पहिल्या पर्वातील विनोदामुळे समयवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसऱ्या पर्वामध्ये तो काळजी घेताना दिसून येतो. पण, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये त्याने काश्मिरी पंडितांची स्थिती आणि बिहारी लोकांचे स्थलांतर यांवरून विनोद केल्याने नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाला समय रैना?

समय रैना व शॅरॉन वर्मा यांच्यामध्ये झालेल्या संवादातून त्यांनी विनोद करून एकमेकांवर लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी एकमेकांच्या मूळ गावावरून विनोद केल्याचं दिसून आलं. मिश्कील अंदाजात शर्मनची ओळख करून देताना समय म्हणाला, “ती बिहारची आहे. ती इतकी बिहारी आहे की, ‘इबोला’ म्हणजे कोणीतरी काहीतरी बोललं, असं तिला वाटतं.” समयच्या या विनोदावर शर्मननंहीदेखील त्याला उत्तर दिलं. शॅरॉन म्हणाली, “समय इतका काश्मिरी आहे की, त्याला दगड मारून घ्यायला आवडतात.”

पुढे समय रैनानं बिहारी असल्यामुळे मुंबईमध्ये कामासाठी आल्याचा उल्लेख केला. समय म्हणाला, “ही कामासाठी बिहार सोडून मुंबईत आलीये.” त्यावर शॅरॉननं, “कमीत कमी मी माझ्या मर्जीनं तरी राज्य सोडून आलीये.” दोघांमधील या संवादाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी काश्मिरी पंडितांबाबत चुकीचं विधान केल्याचं म्हणत इतर राज्यांचा अपमान केल्याचं मत नेटकरी व्यक्त करीत आहेत.

समय रैनाच्या काश्मिरी पंडितांच्या विनोदावर नेटकऱ्यांचा संताप

समय रैना व शॅरॉन वर्माच्या बिहारी व काश्मिरी पंडितांच्या या विनोदावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. एका नेटकऱ्यानं लिहिलं, “विनोद आपल्या जागी असतो आणि सत्य परिस्थिती एका जागी असते. काश्मिरी पंडितांबाबत जे झालं, त्यावरून जोक्स करू नका. कारण- त्यामुळे आमचं मन खूप दुखावलं जातं. असे विनोद ऐकून तर खूप त्रास होतो.” दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, “आमच्या काश्मिरी पंडितांबरोबर जे झालं, तसं कोणाबरोबरच होऊ नये, हीच देवाकडं प्रार्थना.”

नेटकऱ्यांनी, “काश्मिरी पंडितांवरील जोक समय तुला पुन्हा तुरुंगात पाठवणार.” एकानं लिहिलं, “समयच्या शोचा हा एपिसोडसुद्धा डिलीट होणार आहे.” “काश्मिरी पंडितांच्या जखमेवर मीठ चोळणं बंद करा, अतिशय खालच्या स्तराचा विनोद” अशा अनेकविध कमेंट्स करीत नाराजी व्यक्त केली आहे.