scorecardresearch

“जेव्हा मी त्यांच्यासमोर…” नसीरुद्दीन शाहांबरोबर रोमँटिक सीन करण्याबद्दल संध्या मृदुलचं वक्तव्य

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह ‘ताज- डिवाइडेड बाय ब्लड’ या वेबसीरिजमध्ये अकबराची भूमिका साकारणार आहेत.

sandhya mridul

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह ‘ताज- डिवाइडेड बाय ब्लड’ या वेबसीरिजमध्ये अकबराची भूमिका साकारणार आहेत. या सीरिजचा ट्रेलर लाँच करण्यात आला, त्यानंतर नसीरुद्दीन शाह यांनी मुघलांबद्दल वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली होती. मुघल इतकेच वाईट होते, तर त्यांनी बांधलेले ताज महल व लाल किल्ला पाडा, असं ते म्हणाले होते. या सीरिजमध्ये धर्मेंद्र, अदिती राव हैदरी, संध्या मृदुल यांच्यादेखील महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

“…तर ताजमहाल, लाल किल्ला पाडा” मुघलांचा उल्लेख करत नसीरुद्दीन शाहांचं वक्तव्य; म्हणाले “माझ्या विचारांना विरोध…”

या सीरिजमध्ये अभिनेत्री संध्या मृदुल नसीरुद्दीन शाहबरोबर रोमँटिक सीन करताना दिसणार आहे. संध्या मृदुल जोधाबाईच्या भूमिकेत तर, नसीरुद्दीन शाह अकबराची भूमिका करणार आहे. या दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दोघांच्या रोमँटिक सीनबद्दल संध्याला विचारण्यात आलं. त्यावर संध्या म्हणाली, “अकबर आणि जोधाचे चांगले संबंध आहेत, अकबर जोधावर प्रेम करतो. ते दोघं मित्रही आहेत. इतकंच नव्हे तर अकबर जोधाचा सल्लाही घेतो. त्यांच्यात रोमँटिक नातं आहे, असं मी म्हणू शकत नाही. पण त्यांच्यात प्रेम नक्कीच आहे. या दोघांच्या नात्यांचे अनेक पैलू या सीरिजमध्ये पाहायली मिळतील.”

Video: अदिती राव हैदरी व सिद्धार्थ लग्न करणार? अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर सेलिब्रिटींच्या कमेंट्स चर्चेत

नसीरुद्दीन शाहांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, याचा आनंद असल्याचं संध्याने सांगितलं. “नसीर सरांबरोबर काम करताना मी खूप कंफर्टेबल होते. जेव्हाही मी त्यांच्यासमोर स्क्रीनवर यायचे तेव्हा ते खूप विनोद करायचे. ते म्हणायचे, ‘अरे देवा! ही मुलगी खूप तरुण दिसते, संध्या तू खरंच कधी म्हातारी होशील का? नशीब या मुलीबरोबर माझे फारसे रोमँटिक सीन नाहीत.’ त्यांना मी आवडायचे आणि ते नेहमी मस्करी करायचे. त्यांना विनोदाची उत्तम जाण आहे, त्यामुळे एखाद्या सीनमध्ये कम्फर्टेबल वाटलं नाही, तरी ते फक्त विनोद करायचे. ‘अरे किमान हिचे केस पांढरे तरी करायचे ना, ही माझ्या मुलीची भूमिकाही करू शकते,” असं संध्या नसीरुद्दीन शाहांबरोबरचा कामाचा अनुभव सांगताना म्हणाली.

‘ताज- डिवाइडेड बाय ब्लड’ ही वेब सीरिज ५ मार्च रोजी झी 5 वर प्रदर्शित केली जाणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 12:39 IST