सारा अली खान ही नेहमीच विविध कारणांमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आजच तिच्या ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या छोट्याशा व्हिडीओ क्लिपमधून साराचा या चित्रपटातील लूक प्रेक्षकांसमोर आला. परंतु यातील तिचा अभिनय आणि तिची संवाद प्रेक्षकांना अजिबात आवडलेली नाही. आता या टीझरच्या व्हिडीओवर कमेंट करत अनेक जणांनी तिला ट्रोल केलं आहे.

हा चित्रपट स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्या जीवनावर आधारित आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेलं योगदान या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर उलगडलं जाणार आहे. सारा अली खान या चित्रपटात उषा मेहता यांची भूमिका साकारत आहे. आजच या चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित झाला. यात सारा अली खान हळूच एका अंधाऱ्या खोलीत येते आणि रेडिओ सदृश यंत्र सुरू करून ती बोलायला सुरू करते. तिच्या बोलण्यात स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘भारत छोडो’ आंदोलनाचे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात. अशातच तिच्या घराचं दार ठोठावल्याचा आवाज येतो, असं दाखवलं गेलं आहे. परंतु यातील तिची देहबोली नेटकऱ्यांना आवडलेली नाही.

swatantra veer savarkar budget
रणदीप हुड्डाने ज्यासाठी मालमत्ता विकली, त्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपटाचं मूळ बजेट किती? जाणून घ्या
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
supriya pilgaonkar praised swatantra veer savarkar movie
“१२ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी…”, सुप्रिया पिळगांवकरांची ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल पोस्ट; म्हणाल्या…
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

आणखी वाचा : सारा अली खानने केला मुंबई लोकलमधून प्रवास, तिला बघताच सहप्रवाशांनी केलं असं काही की…

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकीकडे साराचे फॅन्स तिचं कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “साराची संवादफेक खूपच निरस वाटत आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “तिचा अभिनय अत्यंत भावनाशून्य वाटत आहे. तिच्यासाठी ही एक चांगली संधी होती परंतु तीदेखील सारा वाया घालवेल दिसतंय.” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “सारा आहे घराणेशाहीचं उत्तम उदाहरण आहे.” यासोबतच अनेकांनी तिची तुलना ‘राझी’ चित्रपटातील आलिया भट्टच्या अभिनयाशी केली. आलियाने ही भूमिका कैकपटीने चांगली केली असती असं अनेकांनी म्हटलं.

हेही वाचा : Ae Watan Mere Watan Trailer : ‘भारत छोडो’ आंदोलन अन् एका कॉलेजवयीन तरुणीचा संघर्ष; सारा अली खानच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

दरब फारूकी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि कन्नन अय्यर हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत आहे. या चित्रपटाची तारीख अजून नक्की झाली असून हा चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.