scorecardresearch

Ae Watan Mere Watan Trailer : ‘भारत छोडो’ आंदोलन अन् एका कॉलेजवयीन तरुणीचा संघर्ष; सारा अली खानच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

१९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाची पार्श्वभूमी आपल्याला पाहायला मिळणार आहे

Ae Watan Mere Watan Trailer : ‘भारत छोडो’ आंदोलन अन् एका कॉलेजवयीन तरुणीचा संघर्ष; सारा अली खानच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Ae Watan Mere Watan Trailer : बॉलिवूडमध्ये सध्या स्टारकिड्सची सध्या चांगलीच चलती आहे, त्या स्टारकिड्सपैकी सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिचं काम प्रेक्षकांना आवडलं आहे. नुकतीच सारा अली खानच्या ‘ए वतन मेरे वतन’ या आगामी चित्रपटाची घोषणा झाली आहे. करण जोहरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या चित्रपटाचा एक छोटासा टीझर पोस्ट केला आहे.

हा चित्रपट एक थ्रिलर ड्रामा पठडीतला असून एका तरुण फ्रीडम फायटर उषा मेहता यांची कथा यातून उलगडली जाणार आहे. टीझरमध्ये सारा अली खान हळूच एका अंधाऱ्या खोलीत येते, आणि रेडिओ सदृश यंत्र सुरू करून ती बोलायला सुरू करते. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘भारत छोडो’ आंदोलनाचे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात, आणि अशातच तिच्या घराचं दार ठोठावल्याचा आवाज येतो.

आणखी वाचा : Selfiee Trailer : सुपरस्टार आणि त्याच्या चाहत्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्सवरून पेटला वाद; अक्षय-इमरानच्या ‘सेल्फी’चा ट्रेलर पाहिलात का?

हा चित्रपट त्या काळातील काही सत्यघटनांवर आधारित आहे. एक कॉलेजवयीन तरुणी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेते हा प्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाची पार्श्वभूमी आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्वातंत्र्य लढ्यातील तरूणांची हिंमत, देशभक्ती, बलिदान याचं चित्रण आपल्याला यात पाहायला मिळणार आहे.

दरब फारूकी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि कन्नन अय्यर हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. याविषयी करण जोहर म्हणाला, “या चित्रपटाच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील इतिहासातील न उलगडलेली पानं उलगडली जाणार आहेत. सारा अली खानला आजवर तुम्ही अशा भुमिकांमध्ये पाहिलंच नसेल.” या चित्रपटाची तारीख अजून नक्की झाली असून हा चित्रपट ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 11:42 IST

संबंधित बातम्या