सोनी लिव्हवर अनेक दमदार चित्रपट व वेब सीरिज उपलब्ध आहेत. या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक गाजलेल्या सीरिजबद्दल जाणून घेऊयात. सोनी लिव्हवरील सर्वाधिक पाहिलेली सीरिज ‘स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी’ आहे. त्याचबरोबर ‘रॉकेट बॉइज’, ‘महारानी’, ‘अनदेखी’ या सीरिजलाही प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. या सीरिजची यादी पाहुयात. हंसल मेहता दिग्दर्शित ‘स्कॅम १९९२’ ही सीरिज खूप गाजली होती. या सीरिजला ९.२ रेटिंग मिळाले आहे. या सीरिजमध्ये शेअर बाजारातील ब्रोकर हर्षद मेहताची गोष्ट दाखवण्यात आली आहे. प्रतीक गांधीने यात हर्षद मेहताची दमदार भूमिका साकारली होती. ती सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या भारतीय वेब सीरिजपैकी एक आहे.
रॉकेट बॉइज
Rocket Boys on OTT: ही सीरिज भारतातील महान शास्त्रज्ञ होमी जे. भाभा आणि विक्रम साराभाई यांच्या जीवनावर आधारित आहे.
महारानी
Maharani on OTT: हुमा कुरेशीची मुख्य भूमिका असलेल्या पॉलिटिकल ड्रामामध्ये बिहारच्या राजकारणातील गुंतागुंत आणि एका सामान्य महिलेचा मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
अनदेखी
Undekhi on OTT: एका श्रीमंत कुटुंबातील लग्नात झालेल्या हत्येबद्दल आणि त्यानंतरच्या गोंधळावर बेतलेली ही क्राइम थ्रिलर सीरिज प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
अवरोध
Avrodh: The Siege Within on OTT: उरीतील सर्जिकल स्ट्राईकच्या खऱ्या घटनांवर आधारित, ही थ्रिलर चित्रपट सैन्याचे शौर्य आणि रणनीती यावर बेतलेली आहे.
जेएल 50
या सीरिजची कथा एका रहस्यमय विमान अपघाताभोवती फिरते. २०१९ मध्ये उत्तर बंगालमध्ये एका विमान अपघाताचे अवशेष सापडतात. सीबीआय अधिकारी शांतनु (अभय देओल) या प्रकरणाचा तपास करायला घेतो, तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर येते: जे विमान कोसळले आहे, ते ‘JL 50’ आहे, ज्याने ३५ वर्षांपूर्वी (१९८४ मध्ये) कोलकात्यातून उड्डाण केले होते आणि तेव्हापासून ते बेपत्ता होते. ३५ वर्षांपूर्वी गायब झालेले विमान अचानक २०१९ मध्ये कसे कोसळले? हा ‘टाइम ट्रॅव्हल’चा प्रकार आहे की काही मोठा कट? याचे उत्तर या सीरिजमध्ये मिळते.
तनाव
Tanaav on OTT: ‘तनाव’ ही इस्रायली सीरिज ‘फौदा’ चे (Fauda) अधिकृत भारतीय रूपांतर आहे. ही कथा काश्मीरमधील दहशतवाद आणि तिथल्या विशेष सुरक्षा दलाच्या कार्यावर आधारित आहे. यात एका निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत बोलावले जाते, कारण त्याने मारलेला समजलेला दहशतवादी प्रत्यक्षात जिवंत असतो.

