नेटफ्लिक्सवरील सर्वोत्कृष्ट मालिकांपैकी एक, ‘मनी हाइस्ट’, प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या स्पॅनिश मालिकेची कथा आणि पात्रे लोकांना खूप भावली होती. या मालिकेत काही चोरांची कथा दाखवण्यात आली आहे, जे एकत्र येऊन एक टीम बनवतात आणि अत्यंत शिताफीने मोठ्या चोऱ्या करतात. आजही ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूप चर्चेत आहे. जर तुम्हाला अशीच फसवणुकीवर (स्कॅम) आधारित चित्रपट आणि मालिका बघायला आवडत असतील, तर आम्ही तुम्हाला ५ सर्वोत्तम चित्रपट आणि शोंबद्दल माहिती देणार आहोत.

स्पेशल २६

Special 26 On Ott : २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्पेशल २६’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात खोटी सीबीआय टीम लोकांना लोकांची लुट करते त्यानंतर खरी सीबीआय त्यांचा माग काढते आणि जे काही होते, ते पाहून प्रेक्षक चकित होतात. हा चित्रपट यूट्यूबवर पाहता येईल.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Two people from Hadapsar area have cheated of 28 lakhs by cyber thieves
सायबर चोरट्यांकडून दोघांची २८ लाखांची फसवणूक
Shocking video MP: Fraudsters Replace QR Codes Of Several Shopkeepers To Redirect Payment In Their Bank Accounts In Khajuraho
तुम्हीही सगळीकडे QR कोडने पेमेंट करता का? वेळीच सावध व्हा; फसवणुकीचा हा Video पाहून दुकानदारांच्या पायाखालची जमीन सरकेल
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
torres financial fraud loksatta news
Money Mantra : टोरेससारखी फसवणूक टाळायची असेल तर हा लेख तुमच्यासाठीच
pimpri chinchwad cyber crime loksatta news
सायबर क्राइम : महिन्याला दहा टक्के परतावा? उच्चशिक्षित तरुणाची ८० लाखांची अशी झाली फसवणूक…
investment management in guidance on iccha pattra in parle
पार्ल्यात उद्या गुंतवणूक व्यवस्थापन, ‘इच्छापत्रा’वर मार्गदर्शन; सायबर फसवणुकीच्या सापळ्यांपासून बचावाचे उपाय

हेही वाचा…प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहेत ‘हे’ गाजलेले रोमँटिक-थ्रिलर चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?

वॉल स्ट्रीट

Wall Street On OTT : १९८७ साली प्रदर्शित झालेला ‘वॉल स्ट्रीट’ हा हॉलिवूड चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटात काही तरुण दलाल वॉल स्ट्रीटच्या चकचकीत दुनियेत गुंतून जातात. त्यांना फक्त पैसा दिसतो आणि ते पैसे कमवण्यासाठी कोणताही चुकीचा मार्ग स्वीकारण्यास मागेपुढे पाहत नाहीत. हा चित्रपट डिज्नी + हॉटस्टार आणि प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

बॅड बॉय बिलेनियर्स

Bad Boy Billionaires On Ott : ‘बॅड बॉय बिलेनियर्स’ ही एक माहितीपट मालिका आहे, ही सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर खूप वाद झाले होते. २०२० साली नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ही मालिका विजय मल्ल्या, नीरव मोदी यांसारख्या व्यक्तींवर आधारित आहे. या माहितीपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आणि या मालिकेने चांगले रेटिंग मिळवले आहे.

हेही वाचा…अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर रवी किशन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा दिवस चित्रपटसृष्टीसाठी…”

द बिग बुल

The Big Bull Ott : २०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘द बिग बुल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन कुकी गुलाटी यांनी केले आहे. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येतो. शेअर मार्केट आणि त्यासंबंधित घोटाळा यावर हा चित्रपट आधारित आहे.या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट डिज्नी + हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

हेही वाचा…अभिनयातील ब्रेकचा उल्लेख असणाऱ्या ‘त्या’ पोस्टवर विक्रांत मॅसीने दिले स्पष्टीकरण म्हणाला, “सोशल मीडियाचा दबाव…”

बदमाश कंपनी

Badmaash Company On Ott : २०१० साली परमीत शेट्टी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बदमाश कंपनी’ या चित्रपटात काही तरुण एकत्र येतात ते एक कंपनी स्थापन करतात आणि त्याद्वारे फसवणूक करतात. या चित्रपटात शाहिद कपूर, अनुष्का शर्मा यांसारखे स्टार्स दिसून आले. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

Story img Loader