शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर, 'पठाण' आता ओटीटीवरही होणार प्रदर्शित, पाहा कुठे पाहता येणार चित्रपट? | shahrukh khan deepika padukone pathaan movie release on ott platform soon see details | Loksatta

शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर, ‘पठाण’ आता ओटीटीवरही होणार प्रदर्शित, कुठे पाहता येणार चित्रपट?

शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट ओटीटीवरही प्रदर्शित होणार, नवी माहिती समोर

shah rukh khan deepika padukone
शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट ओटीटीवरही प्रदर्शित होणार, नवी माहिती समोर

शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या बक्कळ कमाई करत आहे. चार वर्षांनंतर शाहरुखने रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. त्याचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर तुफान गर्दी केली. तर त्याच्या चाहत्यांनी चित्रपट प्रदर्शित होताच मोठा आनंद साजरा केला. ‘पठाण’ चित्रपटाबाबत एक नवी माहिती आता समोर आली आहे.

आणखी वाचा – Video : ‘पठाण’ चित्रपट सुरू असतानाच चाहत्यांनी थिएटरमध्येच फोडले फटाके अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

शाहरुखचे चाहते ‘पठाण’ पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये जात आहेत. तर दुसरीकडे चित्रपटाची कमाईही वाढत आहे. पण शाहरुखच्या चाहत्यांसाठी आता आणखी एक खुशखबर आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच प्रेक्षकांना ‘पठाण’ ओटीटीवरही पाहता येईल.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘पठाण’ प्रदर्शित होणार?

एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ९० दिवसांनीच तो चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला जातो. त्यामुळे ‘पठाण’ ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी प्रेक्षकांना ९० दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. अॅमोझॉन प्राइमवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. लेट्ससिनेमा नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे.

आणखी वाचा – Video : ‘पठाण’मधील ‘तो’ सीन सुरू असतानाच इंडोनेशियाच्या थिएटरमध्ये प्रेक्षकांनी स्क्रिनकडे घेतली धाव; घडलं असं काही की…

‘पठाण’ हिंदीसह तमिळ, तेलुगू भाषेमध्येही प्रदर्शित करण्यात आला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अगदी कहरच केला. कोणी चित्रपटगृहाबाहेर फटाके फोडले तर कोणी शाहरुखच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक केला. इतकंच नव्हे तर काही चित्रपटगृहांबाहेर चाहत्यांनी ढोल-ताशांच्या तालावर नाचायला सुरुवात केली. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात ५५० कोटींची कमाई केली आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 14:51 IST
Next Story
Aarya 3 Teaser: डॅशिंग लूक, हातात सिगार अन्…, सुश्मिता सेनच्या ‘आर्या ३’चा टीझर पाहिलात का?