बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने २०२३ हे वर्षं गाजवलं. चार वर्षे रुपेरी पडद्यापासून लांब राहिलेल्या शाहरुखने एकाच वर्षांत तीन ब्लॉकबस्टर चित्रपट देत तोच बॉक्स ऑफिसचा खरा राजा असल्याचं सिद्ध केलं. ‘पठाण’मधून दमदार कमबॅक केल्यावर ‘जवान’सारखा १००० कोटींहून अधिक कमाई करणारा चित्रपट त्याने दिला. त्यानंतर राजकुमार हिरानी यांच्याबरोबर शाहरुखने एक आगळावेगळा हटके असा ‘डंकी’ हा चित्रपट दिला.

‘पठाण’ आणि ‘जवान’प्रमाणे शाहरुखच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली नाही, पण प्रेक्षकांच्या काळजाला या चित्रपटाने हात घातला. सुरुवातीला या चित्रपटाने कमी कमाई केली पण नंतर हळूहळू त्यांच्या कमाईचे आकडे वाढायला लागले. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनील्क’च्या रिपोर्टनुसार ‘डंकी’ने भारतात २२७ कोटींचा व्यवसाय केला तर जगभरात या चित्रपटाने ४७०.६० कोटींची कमाई केली.

Mayank reveals Ishant and Navdeep advised for IPL 2024
IPL 2024 : ‘वेगाशी तडजोड नाही…’, इशांत-नवदीपने मयंक यादवला दिला महत्त्वाचा सल्ला, वेगवान गोलंदाजाने केला खुलासा
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा
Can weight loss drugs prevent heart attacks
वजन कमी करण्याचे हे औषध हृदयविकाराचा झटका टाळू शकते का? Semaglutide बाबत काय सांगतात डॉक्टर?

आणखी वाचा : “मला माझं करिअर संपवायचं आहे…”, किंग खान शाहरुख खानचं मोठं विधान

बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केल्यानंतर ‘डंकी’ आता ओटीटीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. काल १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे निमित्त शाहरुखने एक खास व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांना एक सरप्राइज देणार असं स्पष्ट केलं. ते सरप्राइज म्हणजे ‘डंकी’च्या ओटीटी रिलीजची बातमी होती. शाहरुखचा ‘डंकी’ हा आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आजपासूनच हा चित्रपट नेटफ्लिक्सवर लोकांना पाहायला मिळणार आहे.

‘पठाण’ने १०५० कटींचा व्यवसाय केला तर ‘जवान’ने ११०० कोटींचा व्यवसाय केला. त्यासमोर ‘डंकी’ तसा कमाईच्या बाबतीत फिका पडला. अवैध स्थलांतर या पंजाबमधील गंभीर समस्येवर हा चित्रपट बेतलेला होता. ‘डंकी’चं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं, हा हिरानी व किंग खान यांचा एकत्रित केलेला पहिलाच चित्रपट. या चित्रपटात शाहरुख खानसह तापसी पन्नू, विकी कौशल, विक्रम कोचर, बोमन इराणी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते.