Shilpa Shinde MMS Leak Allegation: ‘लॉक अप २’मध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदे सहभागी झाली असून तिच्या वक्तव्यांमुळे आणि खुलाशांमुळे ती चर्चेमध्ये आली आहे. वाइल्ड कार्ड म्हणून आलेल्या शिल्पाचे इतर स्पर्धकांसह वाद होत आहेत. तिने शिवांगी जोशीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता शिल्पाने पुन्हा एकदा तिच्या ‘भाबीजी घर पर हैं’ शोमधील कथित अत्याचारांचा उल्लेख केला आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पाने मालिकेच्या निर्मात्यांवर खोटे लैंगिक अत्याचार केल्याचा खुलासा केला होता. यानंतर आता पुन्हा एकदा शिल्पाने आणखी एक आरोप केला आहे. मालिका सोडल्यानंतर तिचे खोटे व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप शिल्पाने केला आहे.
शिल्पा शिंदेने वरुण यादवशी बोलताना मालिका सोडल्यानंतर तिला दिलेल्या त्रासाचा उल्लेख केला आहे. मालिका सोडल्यानंतर तिला आणि तिच्या कुटुंबाला त्रास दिल्याचा आरोप शिल्पाने केला आहे. २०१५-१६ मध्ये ‘भाबीजी घर पर हैं’ ही मालिका सोडल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये तिला दिलेल्या मानसिक त्रासाबद्दल चर्चा केली आहे. यावेळी तिचा एक एमएमएस व्हिडीओ एका व्यक्तीने तिला पाठवला होता आणि तो रिलीज करू का असे विचारल्याचे शिल्पाने सांगितले आहे.
शिल्पा शिंदेचा ‘भाबीजी…’ मालिकेबाबत खुलासा
शिल्पा म्हणाली, “२०१५-१६ च्या त्या काळात, जेव्हा मी एका शोमध्ये काम करत होते, तेव्हा मला त्यातून काढून टाकण्यात आले आणि बराच गदारोळ झाला. त्यानंतर अनेक लोक सतत मला टार्गेट करत होते; माझ्यासमोर त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही पर्याय उरला नव्हता. नंतर एका मीडियाच्या व्यक्तीने मला एक व्हिडीओ क्लिप पाठवली. मी विचारले, ‘हे काय आहे?’ त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘हा तुझा व्हिडीओ आहे.’ मी आश्चर्यचकित होऊन विचारलं, ‘माझा व्हिडीओ?’ तेव्हा ती म्हणाली, ‘तो सुरू करून बघ.'”
पुढे ती म्हणाली, “तो व्हिडीओ डाउनलोड होत असताना मला क्षणभर वाटलं की तो माझ्या चेंजिंग रूममधला किंवा माझ्याशी संबंधित तर नाही ना? त्यामुळे मी खूप घाबरले होते. मी माझ्या गाडीत बसून तो व्हिडीओ पाहिला. त्यामध्ये एक मुलगा आणि मुलीचा ब्लर केलेला व्हिडीओ होता. तो पाहताच मी विचारलं, ‘हे काय आहे?’ त्यावर समोरच्या व्यक्तीने सांगितलं, ‘हा तुझा व्हिडीओ आहे. मी तिला लगेच म्हणाले, ‘तुझं डोकं जागेवर आहे का? ती बेडशीट बघ, किती घाणेरडी आहे.”
I don't know how much truth she is speaking and how much harassment she faced . But filing a false harassment case is never the solution. There are many legal ways to deal with these situations.#LockUpp2 #LockUpp pic.twitter.com/ttvVaCNme4
— ??????? (@avyyaan) July 15, 2026
६ ते ७ तास सायबर सेलमध्ये बसले होते – शिल्पा शिंदे
शिल्पा पुढे म्हणाली, “मी तिला सांगितलं, “माझं शेवटचं रिलेशनशिप कधी आणि कोणाबरोबर होतं हे मला माहीत आहे, त्यामुळे हे अशक्य आहे. तिने मला विचारलं की हा व्हिडीओ रिलीज करू का? ते ऐकून मला धक्काच बसला. लोक इतक्या खालच्या स्तराला जाऊ शकतात याची मला कल्पनाही नव्हती. त्यानंतर मी ६ ते ७ तास सायबर क्राईम सेलमध्ये बसले. तपासानंतर समोर आलं की तो व्हिडीओ दुसऱ्याच एका मुलीचा होता. त्या व्हिडीओचं एडिटिंग करण्यात आलं होतं आणि व्हिडीओ ब्लर करण्यात आला होता. सगळीकडं भाबीजींचा एमएमएस आऊट झालाय अशी अफवा पसरवण्यात आली होती.”
प्रचंड मानसिक त्रास – शिल्पा शिंदे
पुढे शिल्पा शिंदे म्हणाली, “लोकांनी माझ्या आईलाही याबद्दल विचारलं होतं. आमच्या सोसायटीच्या वॉचमननंही माझ्या आईला मुलीचा एमएमएस लीक झाला का असा प्रश्न विचारला होता. अशा वेळी काय उत्तर द्यायचं? मी खूप काही सहन केलं आहे. ‘बिग बॉस ११’मध्ये जाण्यापूर्वीही माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जामीन मिळाल्यानंतर मी त्या शोमध्ये सहभागी झाले. त्या काळात मला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला होता.”
