अभिनेत्री श्रिया पिळगांवकर सध्या ‘ब्रोकन न्यूज २’ या तिच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. राधा भार्गवच्या रुपात पुन्हा एकदा ती प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी तयार आहे. दिग्गज मराठमोळं सेलिब्रिटी जोडपं सुप्रिया व सचिन पिळगांवकर यांची लेक श्रिया ही दत्तक मुलगी असल्याच्या काही बातम्या येत होत्या. आता एका मुलाखतीत खुद्द श्रियालाच याबाबत विचारण्यात आलं आहे. अभिनेत्रीने तिच्या दत्तक असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत, श्रियाला ती दत्तक मुलगी असल्याच्या बातमीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, “एका बातमीत कुठेतरी म्हटलं होतं की मला दत्तक घेण्यात आलं होतं. पण तसं नाही, मी माझ्या आई-वडिलांची दत्तक मुलगी नाही. त्यांनी मला दत्तक घेतल्याची एक बातमी आली होती, पण ती पूर्णपणे खोटी बातमी आहे.”

बोल्ड कंटेंटमुळे प्रदर्शनावर घालण्यात आली बंदी, ‘हे’ चित्रपट ओटीटीवर आहेत उपलब्ध, वाचा यादी

श्रिया पुढे म्हणाली, “खरं तर मी काहीतरी स्पष्टीकरण त्यावं असा हा विषय नाही, कारण मी माझी बाजू मांडण्यासाठी माझं जन्म प्रमाणपत्र इन्स्टाग्रामवर दाखवणार नाहीये. पण हो, ही बातमी अजिबात खरी नसली तरी हास्यास्पद नक्कीच होती. पण, याशिवाय माझ्याबद्दल इतर कोणत्याही वाईट गोष्टी लिहिल्या गेलेल्या नाहीत.”

“जहांगीर…”, चिन्मय मांडलेकरच्या लेकाच्या नावावरील ट्रोलिंगवर सुप्रिया पिळगावकरांची मार्मिक पोस्ट, म्हणाल्या…

तिच्या वेब सीरिजच्या विषयाला अनुसरून बातम्यांमध्ये राहण्याबद्दल तिला विचारण्यात आलं. श्रिया म्हणाली, “खरं तर मी या क्षणापुरतं बातम्यांमध्ये राहण्याचा विचार करत नाही, तर येणाऱ्या वर्षांसाठी प्रासंगिक राहण्याचा विचार करते. त्यामुळे मी छोट्या-मोठ्या पीआर अॅक्टिव्हिटीजच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहत नाही. माझ्यासाठी एक अभिनेता म्हणून तुम्ही किती शिकत आहात आणि विकसित होत आहात हे महत्त्वाचं आहे.”

२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…

“माझे वडील ६० वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहेत आणि अजूनही ते या इंडस्ट्रीशी संबंधित आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांना सतत काहीतरी शिकायचंय आणि स्वतःच विकास करायचा आहे. मी ‘फॅन’ चित्रपट केला तेव्हा शाहरुख खानच्या बाबतीतही असंच होतं. भूक आणि अजून चांगलं काम करण्याची इच्छा आपोआप प्रासंगिकता आणते. मी वैयक्तिकरित्या कधीही बातम्यांमध्ये राहण्याचा प्रयत्न केला नाही किंवा प्रसिद्धी स्टंट म्हणून माझ्याबद्दल खोट्या बातम्या दिल्या नाहीत. माझ्याकडे चांगला प्रोजेक्ट असेल तर त्याबद्दल मी माध्यमांसमोर बोलू शकते पण फक्त बातम्यांमध्ये राहण्यासाठी मी माझ्याबद्दल खोटी माहिती देणार नाही,” असं श्रिया म्हणाली.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shriya pilgaonkar reacts on fake news of being adopted by parents supriya sachin pilgaonkar hrc
First published on: 25-04-2024 at 08:14 IST