सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीचा शाही विवाह सोहळा पाहता येणार; 'या' ओटीटी प्लँटफॉर्मने दिले संकेत spg 93 | siddharth kiara advani sell their wedding films right to amazon prime ott platform | Loksatta

सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीचा शाही विवाह सोहळा पाहता येणार; ‘या’ ओटीटी प्लँटफॉर्मने दिले संकेत

सिद्धार्थ-कियाराच्या विवाहसोहळा राजस्थानमध्ये पार पडणार आहे. लग्नात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत.

kiara sid
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

मागच्या वर्षापासून मनोरंजन विश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. नुकतंच अथिया शेट्टी व के.एल.राहुलने लग्नगाठ बांधली. आता सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीची लगीनघाई सुरू आहे. कियारा-सिद्धार्थ ६ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणर आहेत.विशेष म्हणजे त्यांचा विवाहसोहळा आता सगळ्यांना पाहता येईल अशी चर्चा आहे.

कियारा-सिद्धार्थच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. आजतकने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर पार पडणार आहे. हा शाही विवाहसोहळा पाहता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल अशी शक्यता वर्तवली जात होती कारण अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक फोटो शेअर केला ज्यावरून चर्चांना उधाण आले. मात्र इंडिया टुडेला मिळालेल्या सिद्धार्थ कियाराच्या विवाह सोहळ्याच्या प्रक्षेपणाचे हक्क अमेझॉन प्राईमला विकलेले नाहीत. त्यांनी केवळ एक पोस्ट शेअर केली आहे.

Video : राखी सावंतने पतीच्या अफेअवरून माध्यमांवर साधला निशाणा; म्हणाली, “माझं आदिलबरोबर ब्रेकअप…”

सिद्धार्थ कियाराच्या लग्नासाठी १०० ते १२५ लोकांना निमंत्रण दिलं गेलं आहे. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, करण जौहर व वरुण धवन यांना लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कियारा-सिद्धार्थच्या लग्नासाठी सूर्यगढ पॅलेसवरील लक्झरी व्हिला बुक करण्यात आला आहे. या व्हिलामध्ये तब्बल ८४ खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. तर पाहुण्यांसाठी ७० गाड्याही बुक करण्यात आल्या आहेत.

दरम्यान सिद्धार्थ कियारा यांनी शेरशहा चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. इथूनच त्यांच्या प्रेमकहाणीला सुरवात झाली. अनेक दिवसांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते आता अखेर ते विवाहबंधनात अडकून नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 16:13 IST
Next Story
“तुमचे आशीर्वाद…” मानसी नाईक लवकरच करणार नवी सुरुवात, पोस्ट चर्चेत