Sirai Box Office Collection and OTT Release: दर शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर नवीन चित्रपट रिलीज होत असतात. पण यापैकी सर्वाधिक चर्चा मोठ्या स्टारच्या, बिग बजेट चित्रपटांची होती. त्याबरोबर रिलीज होणारे चित्रपट कोणाच्या खिजगणतीतही नसतात. पण असेच काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करून जातात. अगदी कमी बजेट असलेले चित्रपट कैक पटीने जास्त कमाई करून सर्वांचे लक्ष वेधून घेतात. अशाच एका चित्रपटाबद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. या चित्रपटाचं नाव आहे ‘सिराई’.

‘सिराई’मध्ये कोणताही मोठा स्टार नाही. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खास बजेट नव्हतं. डिसेंबर २०२५ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने मात्र बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. या क्राइम थ्रिलर चित्रपटात विक्रम प्रभू व अक्षय कुमार हे दोघे नवोदित कलाकार होते. पण तरीही त्यांचा अभिनय व चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूप भावली आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं.

‘सिराई’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘कोइमोइ’च्या अहवालानुसार, ‘सिराई’ या तमिळ चित्रपटाने पहिल्या दिवशी १ कोटी कमावले होते. तर पहिल्या आठवड्याची कमाई ११.९२ कोटी रुपये होती. या चित्रपटाने जगभरात २६.४९ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर, भारतात २१.१ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.

चित्रपटाने कमावला तब्बल ७८३% नफा

चित्रपटाच्या बजेटच्या तुलनेत कमाईचा विचार करता याने प्रचंड नफा कमावला. अवघ्या ३ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल २६.४९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. या हिशोबाने ‘सिराई’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ७८३% नफा मिळवला.

काय आहे ‘सिराई’ चित्रपटाची कथा?

या चित्रपटाची कथा ‘कथिरवन’ (विक्रम प्रभू) नावाच्या एका पोलीस कॉन्स्टेबलभोवती फिरते. तर अभिनेता अक्षय कुमारने ‘अब्दुल रौफ’ नावाच्या आरोपीची भूमिका साकारली आहे. संपूर्ण सिनेमा या दोन्ही पात्रांभोवती फिरतो. त्यात इतरही अनेक नवीन पात्रे येतात. पण चित्रपटाचा क्लायमॅक्स आणि सस्पेन्स अत्यंत दमदार आहे.

‘सिराई’ क्राइम थ्रिलर चित्रपट आहे, त्यामुळे तुम्हाला या जॉनरचे सिनेमे पाहायला आवडत असतील तर हा चित्रपट तुम्ही दोन ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. ‘सिराई’ ओटीटी प्ले व झी5 वर उपलब्ध आहे.