मराठी इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांची मुलंसुद्धा आता अभिनय क्षेत्रात सक्रिय झाली आहेत आणि अभिनयासह दिग्दर्शनही करत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेते शरद पोंक्षे यांचा मुलगा स्नेह पोंक्षे. स्नेहने ‘बंजारा’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अशातच आता त्याचा एक नवीन चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.
स्नेह पोंक्षेनेचा ‘बंजारा’ हा चित्रपट १६ मे २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये त्याने अभिनयसुद्धा केलं होतं. दिग्दर्शक म्हणून पहिल्याच चित्रपटातून त्याने अनेकांची पसंती मिळवली. यासह तो त्याचे वडील अभिनेत शरद पोंक्षे यांच्या नाटकांच्या कामांमध्येसही सहभागी असतो. त्यामुळे रंगभूमीचाही त्याच्याकडे अनुभव आहे. अशातच आता स्नेहने एका हॉलीवूड चित्रपटासाठी हिंदीत संवाद लिहिले आहेत. त्याचा हा चित्रपट नुकताच ओटीटीवर रिलीज झाला आहे.
स्नेह पोंक्षेने लिहिले या हॉलीवूड चित्रपटाचे हिंदी संवाद
स्नेह पोंक्षेने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत त्याच्या नवीन प्रोजेक्टबद्दलची माहिती शेअर केली. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत सांगितलं की ‘द डेव्हिल्स माऊथ’ या हॉलीवूड चित्रपटाचे हिंदी संवाद लिहिले आहेत. २९ जुलै रोजी हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज झाला आहे. हॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकार यामध्ये झळकले आहेत. इन्स्टाग्रामवर या चित्रपटांचं पोस्ट रशेअर करत त्याने “न्यू वर्क, हिंदी संवाद लिहिले आहेत” असं म्हटलं आहे.
‘द डेव्हिल्स माउथ’ – ‘द डेव्हिल्स माउथ’ हा २९ जुलैपासून प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा पाच कॉलेजमधील मित्रांभोवती फिरते. पदवी शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी ते थायलंडला फिरायला जातात. तिथे ते ‘द डेव्हिल्स माउथ’ नावाच्या समुद्रातील गूढ गुहांची सफर करण्याचा निर्णय घेतात. मात्र, या रोमांचक प्रवासाचं काही क्षणांतच भीषण अनुभवात रूपांतर होतं आणि त्यांच्यासमोर जीवघेणं संकट उभं राहतं.
स्नेहने याच हॉलीवूड चित्रपटाचे हिंदी संवाद लिहिले असून इंग्रजीसह हा चित्रपट हिंदीतही पाहण्यासाठी उपलब्ध आहे. स्नेह दिग्दर्शन व अभिनयासह लिखानही करतो. त्यामुळे येत्या काळात तो कोणत्या नवीन कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भटीला येणार हे पाहणं रंजक ठरेल.
