south actress samanthas yashoda film streaming on amazon prime from 9th December spg 93 | समंथाचा 'यशोदा' लवकरच येणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर; 'या' दिवशी होणार प्रदर्शित | Loksatta

समंथाचा ‘यशोदा’ लवकरच येणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

तेलुगू आणि तामिळ भाषेत या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते

समंथाचा ‘यशोदा’ लवकरच येणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा आघाडीची अभिनेत्री मानली जाते. खासगी आयुष्यापासून ते चित्रपटांपर्यंत वेगवेगळ्या कारणांनी ती सध्या चर्चेत आहे. नुकताच तिचा यशोदा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३.०६ कोटी इतकी कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ४ कोटीची कमाई केली. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

समांथा रुथ प्रभूचा ‘यशोदा’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. या चित्रपटाच्या घोषणेसूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक होते. ‘यशोदा’ चित्रपटाची कथा सरोगसीवर आधारित आहे. यामध्ये समंथा सरोगेट मदरच्या भूमिकेत आहे. आता हा चित्रपट अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. समंथाच्या चाहत्यांना आता हा चित्रपट पाहता येणार आहे. अमेझॉन प्राईमने ट्वीट करत ही माहिती दिली आहे

या चित्रपटाचे दिग्दर्शन हरी आणि हरीश यांनी केले आहे या चित्रपटात समंथा व्यतिरिक्त उन्नी मुकुंदन, राव रमेश, मुरली शर्मा, मधुरिमा आणि वरलक्ष्मी सरथकुमार यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. तेलुगू आणि तामिळ भाषेत या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते . तसेच हा चित्रपट हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये डब करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 19:13 IST
Next Story
“माझं लग्न अयशस्वी…”; फराह खानने दिल्या जुन्या आठवणींना उजाळा