जर तुम्हाला उत्कंठावर्धक, आणि थ्रिलर चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर आज आम्ही तुम्हाला दक्षिणेतील ५ अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत जे हिंदीत उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व चित्रपट तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता. या सस्पेन्स थ्रिलर फिल्म्समध्ये तुम्हाला थरारक आणि चकित करणारे क्लायमॅक्स पाहायला मिळतील.

ऑपरेशन जावा

२०२१ आलेला मल्याळम क्राइम थ्रिलर ऑपरेशन जावा IMDb वर ८ रेटिंगसह खूप लोकप्रिय ठरला. या सिनेमातील सस्पेन्स पाहून तुम्ही चकित व्हाल. या फिल्ममध्ये बालू वर्गीस, लुकमान अवरान, बिनू पप्पू यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ही कथा सायबर सेल पोलिसांच्या तपासावर आधारित आहे. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षक व समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा सिनेमा यूट्यूबवर हिंदी डबमध्ये मोफत उपलब्ध आहे.

lakshmi niwas siddhu misunderstandings clarified
लक्ष्मी निवास : सिद्धूसमोर येणार सत्य! भावनाबद्दलचे ‘ते’ गैरसमज कोण दूर करणार? सुरू होणार अनोखी लव्हस्टोरी, पाहा प्रोमो
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Savlyachi Janu Savli
Video: “या रंगाने…”, एकीकडे तिलोत्तमा सावलीला घराबाहेर काढणार, तर दुसरीकडे देवाची तिच्या आयुष्यात एन्ट्री होणार; पाहा प्रोमो
Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
Shiva
Video : “तुला काहीतरी सांगायचंय…”, शिवाचा विश्वास खरा ठरणार, आशू त्याचे प्रेम व्यक्त करणार; पाहा नेमकं काय घडणार
Muramba
Video: “ही रमाच आहे की…”, माहीच्या ‘त्या’ कृतीमुळे अक्षयला येणार संशय; ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट
zee marathi ankita walawalkar reveals her lovestory
“झी मराठीमुळेच आमचं जमलं…”, अंकिता-कुणालची पहिली भेट कुठे झाली? हर्षदा खानविलकरांना सांगितली लव्हस्टोरी, पाहा व्हिडीओ
Shiva
Video : “मी सगळं केलं…”, दिव्याचे सत्य समोर आल्यावर शिवा तिच्या कानाखाली देणार; पाहा मालिकेत पुढे काय घडणार?

अभ्यूहम

मुळात मल्याळममध्ये तयार झालेला ‘अभ्यूहम’ देखील यूट्यूबवर हिंदी डबमध्ये मोफत उपलब्ध आहे. IMDb वर या सिनेमाला ७.५ रेटिंग मिळाली आहे. या चित्रपटात मालवी मल्होत्रा, अथमिया राजन आणि राहुल माधव यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मंगळवारम

२०२३ मध्ये आलेला तेलुगु भाषेतील ‘मंगळवारम’ हा एक सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. अजय भूपती यांनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेला हा चित्रपट यूट्यूबवर हिंदीत उपलब्ध आहे. या सिनेमात पायल राजपूत, नंदिता स्वेता, प्रियदर्शी पुलिकोंडा, दिव्या पिल्लई, अजमल अमीर, चैतन्य कृष्णा आणि रवींद्र विजय यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.

केस ऑफ कोंडाना

विजय राघवेंद्र आणि भावना मेनन यांच्या प्रमुख भूमिका असलेली केस ऑफ कोंडाना ही थ्रिलर चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित झाला. मुळात कन्नड भाषेतील हा चित्रपट यूट्यूबवर हिंदी डबमध्ये मोफत उपलब्ध आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देवी प्रसाद शेट्टी यांनी केले आहे.

व्हाइट रोज

सस्पेन्स थ्रिलर फिल्म व्हाइट रोज देखील यूट्यूबवर हिंदी डबमध्ये फ्री उपलब्ध आहे. या सिनेमाचा क्लायमॅक्स पाहून तुम्ही थक्क व्हाल. २०२४ मध्ये आलेल्या या फिल्ममध्ये आनंदी आणि रितिका चतुर्वेदी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader