या आठवड्यात ओटीटीच्या विविध प्लॅटफॉर्मवर अनेक बहुप्रतीक्षित दाक्षिणात्य चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये थलपती विजय यांच्या ‘जना नायकन’चाही समावेश आहे. त्यामुळे दाक्षिणात्य सिनेमाच्या चाहत्यांसाठी या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध असतील. या आठवड्यात ओटीटीवर साऊथचे कोणते चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत, ते जाणून घेऊया.
जन नायकन – ‘जन नायकन’ हा थलपती विजय यांचा शेवटचा चित्रपट असल्याचं म्हटलं जात असल्याने चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली असून आता तो ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. एच. विनोथ दिग्दर्शित हा अॅक्शन ड्रामा २१ ऑगस्टपासून झी ५वर पाहता येणार आहे. या चित्रपटात थलपती विजय यांच्याबरोबर ममिता बैजू, पूजा हेगडे, बॉबी देओल, प्रकाश राज, गौतम वासुदेव मेनन, नारायण आणि प्रियामणी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
‘इन्वाझी थानी वाझी’ – ‘इन्वाझी थानी वाझी’ हा मल्याळम भाषेतील थ्रिलर ड्रामा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन पी. जेरिन यांनी केलं आहे. फजल पुकोडे, हेमा, अभिलाष नारिकुनी, बिंदू बाला आणि जोबन जेकब यांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट १८ ऑगस्टपासून ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
‘मिस्टर मिडिल क्लास’ – ‘मिस्टर मिडिल क्लास’ हा तेलुगू भाषेतील कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन श्री नागेश्वर रेड्डी यांनी केलं आहे. यात मीका श्रीकांत, लया गोर्टी, राजेंद्र प्रसाद, सुनील, वेनेला किशोर, रघु बाबू, पृथ्वीराज आणि अली बाशा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १९ ऑगस्टपासून Aha Video वर स्ट्रीम होत आहे.
‘प्यार प्रेमा कल्याणम’ – एलन दिग्दर्शित ‘प्यार प्रेमा कल्याणम’ हा तमिळ रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एलन, सान्वी मेघाना, राधिका सरथकुमार, योगी बाबू, एम. एस. भास्कर, गीता कैलासम आणि एलंगो कुमारवेल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २१ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
‘चेन्नई लव स्टोरी’ – ‘चेन्नई लव स्टोरी’ हा तेलुगू भाषेतील रोमँटिक चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रवि नंबूरी यांनी केलं आहे. यात किरण अब्बावरम, श्री गौरी प्रिया, थ्रिगुन, देवी प्रसाद, पी. वासू आणि दीपा शंकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट २१ ऑगस्टपासून SonyLIV वर रिलीज होणार आहे.
