This Netflix Series Trending On Ott : जकाल मनोरंजनाचं स्वरूप झपाट्याने बदलत असून नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्म्स प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. दर महिन्याला नव्या सिरीज आणि चित्रपटांमुळे प्रेक्षकांना विविध पर्याय उपलब्ध होत आहेत.  थिएटरपेक्षा घरबसल्या कंटेंट पाहण्याकडे लोकांचा अधिक कल वाढताना दिसतो. विशेषतः क्राइम, थ्रिलर आणि मिस्ट्री अशा जॉनरला मोठी मागणी आहे.  याच वाढत्या लोकप्रियतेमुळे ओटीटी आज मनोरंजन क्षेत्रातील एक महत्त्वाचा भाग बनला आहे. 

सध्या एक सीरिज मोठ्या प्रमाणात ओटीटीवर पाहिली जात आहे. जिने इतर सीरिजला मागे टाकलं असून ही सीरिज ओटीटीवरील सर्वाधिक पाहिली जात असलेली सीरिज बनली आहे. ही सीरिज नेमकी कशी आहे, कथा काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

सीरिजचं नाव काय आहे?

जर तुम्ही मिस्ट्री आणि क्राइम थ्रिलर जॉनर पाहण्याचा विचार करत असाल, तर ही सिरीज तुमच्यासाठी योग्य आहे. ही सिरीज क्राइम, रहस्य आणि थ्रिलरचं उत्तम समीकरण आहे. त्यात स्पोर्ट्स ड्रामाही आहे. रिलीज होताच या सीरिजने दोन आठवड्यांपासून ओटीटीवर आघाडीवर असलेल्या ‘If Wishes Could Kill’ या साऊथ कोरियन हॉरर थ्रिलरला मागे टाकलं आहे. या सीरिजचं नाव आहे ‘ग्लोरी’

नेटफ्लिक्सवर आलेली ही नवीन सिरीज ७ भागांची आहे आणि प्रत्येक भाग तुमची उत्सुकता वाढवते. कथा आणि सीन शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. शेवटचा क्लायमॅक्स इतका धक्कादायक आहे की तुम्ही थक्क व्हाल. ही सिरीज त्याग, बलिदान आणि संघर्षाभोवती फिरते. दोन भाऊ एका मृत्यूच्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी धोकादायक प्रवास करतात.

या सीरिजची कथा काय आहे?

‘ग्लोरी’ या सीरिजच्या कथेबद्दल बोलायचं झालं तर ही कथा दोन वेगळे झालेले भाऊ देव (Divyenndu) आणि रवी (Pulkit Samrat) यांची आहे. ते त्यांची बहिणी गुडिया (Jannat Zubair) वर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा आणि तिच्या बॉयफ्रेंड व बॉक्सर निहाल सिंहच्या हत्येचा उलगडा करण्यासाठी घरी परततात. ही कथा ऑलिम्पिकमध्ये जाण्याचं स्वप्न, सूडाची भावना आणि गुंतागुंतीच्या नात्यांभोवती फिरते. 

१ मे रोजी रिलीज झालेल्या या सीरिजमध्ये दिव्यांदू शर्मा, पुलकीत सम्राट, सुविंदर विकी( Suvinder Vicky), आशुतोष राणा, सयानी गुप्ता, जन्नत जुबेर आणि कुणाल ठाकूर यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात. ही सिरीज नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. रिलीज होताच तिने टॉप ट्रेंडिंग लिस्टमध्ये प्रथम स्थान मिळवलं आहे.