March First Week OTT Series & Movies : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाची मेजवानी पाहायला मिळणार आहे. रोमँटिक, अॅक्शन, थ्रिलरसह विविध जॉनरचे चित्रपट व वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात (२ मार्च ते ८ मार्च) ओटीटीवर कोणकोणते चित्रपट अन् सीरिज प्रदर्शित होणार आहेत, चला जाणून घेऊ…

१. सुबेदार

सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित आणि अनिल कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘सुबेदार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गेले काही दिवस या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटात अनिल कपूर यांच्यासह राधिका मदान, मोना सिंह, आदित्य रावल आणि अनेक इतर कलाकारही आहेत. येत्या ५ मार्चपासून Amazon Prime Video वर ‘सुबेदार’ पाहता येईल.

View this post on Instagram

A post shared by prime video IN (@primevideoin)

२. जब खुली किताब

‘जब खुली किताब’ हा पंकज कपूर, डिंपल कपाड़िया, अपारशक्ती खुराना आणि समीर सोनी यांच्या भूमिका असलेला रोमँटिक-कॉमेडी असलेला चित्रपट आहे. हा चित्रपट ६ मार्चपासून प्रेक्षकांना झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

३. लालो-कृष्ण सदा सहायते

‘लालो-कृष्ण सदा सहायते’ हा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा आणि १०० कोटी कमावलेला पहिला गुजराती चित्रपट आहे. ‘लालो कृष्ण सदा सहायते’चे बजेट फक्त ५० लाख रुपये आहे. २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘छावा’ने सातव्या आठवड्यात ४.३० कोटी रुपये कमाई केली होती. त्या तुलनेत ‘लालो-कृष्ण सदा सहायते’ने दुप्पट म्हणजेच ९.९५ कोटी कमावले. हा चित्रपट ओटीटीवर येण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. येत्या ६ मार्चपासून हा चित्रपट Sony LIV वर पाहता येणार आहे.

४. हेलो बच्चों

‘हेलो बच्चों’ ही सीरिज ‘फिजिक्सवाला’चे संस्थापक अलख पांडे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. ही कथा एका शिक्षकाच्या प्रवासावर आधारित आहे, जो एका लहान शहरात एक सामान्य शिक्षक म्हणून सुरुवात करतो आणि पुढे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा मोठा शिक्षक बनतो. प्रतीश मेहता दिग्दर्शित ‘हेलो बच्चों’ ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर ६ मार्चला रिलीज होणार आहे.

५. विद लव

‘विद लव’ हा तमिळ रोमँटिक चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाइनच्या आठवड्यत रिलीज झाला होता. या चित्रपटातून अभिशन जीविंथ याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. हा चित्रपट प्रेक्षकांना ६ मार्चपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

६. ओम शांती शांती शांती

‘ओम शांती शांती शांती’ हा तेलुगु कॉमेडी चित्रपट ३० जानेवारी रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता. आता हा ओटीटीवर सुद्धा पाहता येणार आहे. थरुन भास्कर आणि ब्रह्मानंदमची भूमिका असलेला हा चित्रपट ४ मार्चपासून Aha या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.