Border 2 Trending No 1 On Netflix : भारतासह जगभरातल्या चित्रपटगृहांत सध्या रणवीर सिंहचा ‘धुरंधर २’ हा चित्रपट धुमाकूळ घालत असतानाच, ओटीटी प्लॅटफॉर्मवर चार सुपरस्टार्स असलेल्या एका चित्रपटाचीसुद्धा चांगलीच चर्चा आहे. ३ तास २२ मिनिटांच्या या चित्रपटाला ओटीटीवर इतका प्रचंड प्रतिसाद मिळत आहे की, त्याने ‘धुरंधर’ चित्रपटालालाही मागे टाकलं आहे.

आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, तो चित्रपट आहे ‘बॉर्डर २’. चित्रपटगृहांत याला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर २३ जानेवारी रोजी हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. ओटीटीवर प्रदर्शित होताच चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. याच प्रतिसादामुळे ‘बॉर्डर २’ ओटीटीवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

‘बॉर्डर २’ नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड

सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झाला होता. देशभक्तीपर विषयामुळे आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट चित्रपटगृहांत सुपरहिट ठरला होता. चित्रपटगृहांतील यशानंतर, ‘बॉर्डर २’ चित्रपट ओटीटीवरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळेच सध्या हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

Award Banner
border 2 trending on netflix
‘बॉर्डर २’ नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड

नेटफ्लिक्सच्या ‘टॉप-१०’ ट्रेंडिंग चित्रपटांची यादी

नेटफ्लिक्सने १६ मार्च ते २२ मार्च या कालावधीसाठी जाहीर केलेल्या ‘टॉप १०’ चित्रपटांच्या यादीत ‘बॉर्डर २’ पहिल्या क्रमांकावर असून ‘धुरंधर’ दुसऱ्या स्थानी आहे. तसेच ‘टॉप-१०’च्या या यादीत ‘मेड इन कोरिया’ तिसऱ्या क्रमांकावर, ‘विथ लव्ह’, चौथ्या आणि ‘वॉर मशीन’ पाचव्या क्रमांकावर आहे. त्याखाली ‘फंकी सहाव्या, ‘पीकी ब्लाइंडर्स: द इमॉर्टल मॅन’ सातव्या, ‘अनोरा’ आठव्या, ‘ग्लॅडिएटर २’ नवव्या आणि ‘राझी’ दहाव्या क्रमांकावर आहे.

border 2 trending on netflix
नेटफ्लिक्सच्या ‘टॉप-१०’ ट्रेंडिंग चित्रपटांची यादी

‘बॉर्डर २’ या चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती

‘बॉर्डर २’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईबद्दल बोलायचे झाले, तर २७५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात ४६४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ३९२ कोटी रुपये होते.

आयएमडीबीवर (IMDb) या चित्रपटाला ६.७ रेटिंग मिळाले आहे. टी-सीरिज आणि जेपी फिल्म्स निर्मित तसेच अनुराग सिंह दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी यांच्यासह मोना सिंह, सोनम बाजवा, मेधा राणा आणि अन्या सिंह यांसारखे अनेक कलाकार आहेत. हा संपूर्ण चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे.