Thriller Movies On OTT : ओटीटी आल्यापासून थ्रिलर, रहस्यमय, डार्क कॉमेडी या जॉनरच्या चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. ओटीटीवर या धाटणीचे अनेक चित्रपट व सीरिजही प्रदर्शित होत असतात. चला तर मग जाणून घेऊ ओटीटीवर सध्या कोणते थ्रिलर, रहस्यमय चित्रपट व सीरिज पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.
अनेक लोकप्रिय कलाकार ओटीटीवरील कलाकृतींमध्ये झळकताना दिसतात. बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करणारे कलाकारही ओटीटीवर पाहायला मिळतात. सनी देओल, राधिका आपटे ते विक्रांत मेस्सी सारख्या अनेक कलाकारांचे चित्रपट ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.
ओटीटीवर पाहा ‘हे’ थ्रिलर चित्रपट
ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध असलेल्या थ्रिलर, रहस्यमय चित्रपटांच्या यादीतील पहिलं नाव आहे राधका आपटे व विक्रांत मेस्सी यांच्या ‘फॉरेन्सिक’ या चित्रपटाचं. हा चित्रपट विज्ञान आणि कायदा यावर आधारित आहे. यामध्ये विक्रांत मेस्सी एका फॉरेन्सिक एक्स्पर्टच्या भूमिकेत आहे, तर राधिका आपटे पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. यामध्ये राधिका व विक्रांत यांची प्रेमकहाणीसुद्धा पाहायला मिळते. या चित्रपटात लहान मुलांचं अपहरण करून त्यांची हत्या केली जाते असं दाखवलं जातं, ज्याचा शोध राधिका घेत असते आणि यावेळी तिला विक्रांतची मदत होते. हा चित्रपट तुम्ही झी ५ वर पाहू शकता.
दाक्षिणात्य अभिनेता दुल्कर सलमान व सनी देओल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘चुप’ हा चित्रपटही ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. यामध्ये सनी देओल पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे, तर दुल्कर सलमानने यामध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. चित्रपटांना चांगला प्रतिसाद न देणाऱ्या समीक्षकांचा तो खून करतो असं पाहायला मिळतं; एवढंच काय तर तो त्याच्या प्रेयसीलासुद्धा मुभा देत नाही. यामध्ये श्रेया धन्वंतरी मुख्य नायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. हा खूप रंजक थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट तुम्ही झी ५ वर पाहू शकता.
बॉब विस्वास – हा एक थ्रिलर सायकोलॉजीकल चित्रपट आहे. यामध्ये अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहे. यामध्ये अभिषेकचा दमदार अभिनय पाहायला मिळतो. हा चित्रपटही तुम्ही झी ५ वर पाहू शकता.
मनोज बाजपेयी, प्राची देसाई यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘सायलन्स – कॅन यू हियर इट’ हासुद्धा ओटीटीवरील थ्रिलर चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट एका गाजलेल्या खटल्यावर आधारित आहे, ज्यामध्ये एका न्यायाधीशाची हत्या होते. जस जसा तपास पुढे जातो तसे कथेत वळण आलेलं पाहायला मिळतं. हा चित्रपट झी ५ वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
रात अकेली हैं – नवाजुद्दीन सिद्दिकी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट लग्नाच्या रात्री एका व्यक्तीच्या झालेल्या खुनाच्या शोधावर आधारित आहे, यामुळे त्याला प्रत्येकावर संशय येतो आणि कथा पुढे जाते तसं हळूहळू सत्य समोर येतं.
डायल १०० – यामध्ये अभिनेते मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत आहेत. ‘डायल १००’ ही सस्पेन्स थ्रिलर फिल्म आहे. यामध्ये मनोज बाजपेयी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळतात. त्यांच्यासह यामध्ये नीना गुप्ताही महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळतात. हा मनोज बाजपेयी यांच्या ओटीटीवरील लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे.
