ग्रेटा गर्विग दिग्दर्शित ‘बार्बी’ हा चित्रपट २१ जुलैला प्रदर्शित झाला. संपूर्ण जगभरात या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली. प्रेक्षकांमध्ये ‘बार्बी’ची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली. तर आता हा चित्रपट ओटीटीवर दाखल झाला आहे. बार्बी या चित्रपटावर भारतात संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या. अनेक जण गुलाबी रंगाचे कपडे परिधान करून हा चित्रपट पाहताना दिसलं, तर दुसरीकडे काहींनी या चित्रपटात दाखवलेल्या दृश्यांवर टीका केली. पण तरीही या चित्रपटाने जगभरातून १.४८ बिलियन डॉलरहून अधिक कमाई केली आहे. तर आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. आणखी वाचा : “१० वर्षांच्या मुलीसह १० मिनिटांत बाहेर…”, ‘बार्बी’ चित्रपटाच्या निर्मात्यांवर जुही परमार संतापली; नेमकं काय घडलं? मार्गोट रॉबी, रायन गॉस्लिंग स्टारर ‘बार्बी’ हा सुपरहिट चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना आता पाहता येणार आहे. हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर भाडे तत्त्वावर उपलब्ध झाला आहे. हा चित्रपट जर प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायचा असेल तर ४९९ रुपये द्यावे लागतील. हेही वाचा : “बार्बी भारतीय असती तर?”, बायको मिताली मयेकरच्या व्हिडीओवर सिद्धार्थ चांदेकरने केली खास कमेंट; म्हणाला, “लगीन करायचंय…” दरम्यान, ‘बार्बी’ या चित्रपटात मार्गोट रॉबी व रायन गॉस्लिंगव्यतिरिक्त अमेरिका फेरेरा, सिमू लियू, केट मॅकिनॉन, मायकल सेरा, हेलेन मिरेन, एरियाना ग्रीनब्लाट यांसारखे जबरदस्त कलाकार आहेत.