Kishkindha Kaandam OTT Release: तुम्हाला दाक्षिणात्य चित्रपट पाहायला आवडत असतील तर लवकरच एक गाजलेला मल्याळम चित्रपट तुम्हाला ओटीटीवर पाहता येईल. ‘किष्किंधा कांडम’ असे या चित्रपटाचे नाव आहे. दोन महिन्यांपूर्वी हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला होता, आता तो ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

बॉक्स ऑफिसवर मल्याळम चित्रपटांचा दबदबा आहे. या चित्रपटांची कथा साधी पण हृदयाला स्पर्श करणारी असते, त्यामुळे ते बॉक्स ऑफिसवर खूप चांगले कलेक्शन करतात. यंदा एक असा मल्याळम चित्रपट आला, ज्या चित्रपटाने आपल्या बजेटपेक्षा दहापट कमाई केली. सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यावर ‘किष्किंधा कांडम’ हा चित्रपट अखेर ओटीटीवर प्रदर्शित होत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध

‘किष्किंधा कांडम’मध्ये आसिफ अली, अपर्णा बालमुरली आणि विजय राघवन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. ओणमच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर १० पट कलेक्शन केले.

हेही वाचा – ‘दृश्यम’ पाहिलाय? त्याहूनही भयंकर आहेत हॉटस्टारवरील ‘हे’ चित्रपट, पाहा हादरवून सोडणाऱ्या सिनेमांची यादी

कुठे पाहता येईल ‘किष्किंधा कांडम’

‘किष्किंधा कांडम’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या ६८ दिवसांनंतर ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा सिनेमा तुम्ही १९ नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल. ओटीटी प्लॅटफॉर्मनेही चित्रपटाच्या रिलीजबाबत अधिकृत घोषणा केली आहे. हरवलेल्या आठवणी आणि लपलेली रहस्ये या किष्किंधा कांडममध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. हा सिनेमा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. हा चित्रपट मल्याळम, हिंदी, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये पाहता येईल.

हेही वाचा – ‘अंधाधुन’ पाहिलाय? त्यापेक्षाही जबरदस्त ट्विस्ट असलेले ‘हे’ चित्रपट आहेत OTT वर, वाचा यादी

‘किष्किंधा कांडम’चे बजेट व बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘किष्किंधा कांडम’ या चित्रपटाचे बजेट फक्त सात कोटी रुपये होते. या चित्रपटाने भारतात तब्बल ४९.०२ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर जगभरात या चित्रपटाने ७६.५२ रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते.

Story img Loader