Vishwanath And Sons ott release: दर आठवड्याला ओटीटीवर अनेक सिनेमे, वेब सीरिज, डॉक्युमेंट्री प्रदर्शित होत असतात. विविध भाषांतील विविध जॉनरचे सिनमे प्रदर्शित होतात. ओटीटी या माध्यमामुळे प्रेक्षकांना जगभरातील कंटेट पाहता येतो. विशेष म्हणजे त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो कंटेंट पाहण्याचा आनंद घेता येतो.
आता ओटीटीवर एक असा सिनेमा प्रदर्शित होणार आहे, ज्या सिनेमाने थिएटरमध्ये २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. विश्वनाथ अँड सन्स, असे या सिनेमाचे नाव आहे. तमीळ सुपरस्टार सूर्या या सिनेमामुळे मोठ्या चर्चेत होता. त्याचा हा सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड आवडला. विश्वनाथ अँड सन्स या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली. आता सिनेमागृहांत धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटीवर येणार आहे. निर्मात्यांनी सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी प्रदर्शित होणार, याबद्दल सांगितले आहे.
‘विश्वनाथ अँड सन्स’ ओटीटीवर होणार प्रदर्शित
विश्वनाथ अँड सन्स हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ११ सप्टेंबर २०२६ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांना ओटीटीवर पाहता येणार आहे. नेटफ्लिक्स इंडियाने इन्स्टाग्रामवर सूर्याचे एक पोस्टर शेअर केले. हे पोस्टर शेअर करीत त्याने लिहिले, “भेटा संजय विश्वनाथला. अॅथलीट, करोडपती, समाजसेवक आणि एक प्रेमळ वडील. ११ सप्टेंबरला विश्वनाथ अँड सन्स हा सिनेमा तमीळ, हिंदी, तेलुगू, कन्नड व मल्याळममध्ये प्रदर्शित होणार आहे.”
विश्वनाथ अँड सन्स या सिनेमाबद्दल बोलायचे तर हा सिनेमा तमीळशिवाय कन्नड, मल्याळम, हिंदी, तेलुगू या भाषांतही थिएटरमध्येही प्रदर्शित झाला होता. आता ओटीटीवरही हा सिनेमा पाचही भाषांत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांना पाहिजे त्या भाषेत हा सिनेमा पाहता येईल. सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर एका महिन्यात आता हा सिनेमा ओटीटीवर पाहता येणार आहे. १४ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.
व्येंकी अटलुरी (Venky Atluri )यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. सूर्याबरोबरच या सिनेमात ममिता बैजू, राधिका सरथकुमार व रवीना टंडन हे कलाकाराही महत्त्वाच्या भूमिकांत दिसतील.
