Survival Thriller Thrash Netflix on Netflix: नेटफ्लिक्सवर सध्या बरेच चित्रपट व वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. या कलाकृती प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहेत. नेटफ्लिक्सवर १ तास २३ मिनिटांच्या एका सर्वायव्हल थ्रिलर चित्रपटाने प्रदर्शित होताच जगभरात धुमाकूळ घातला आहे. अवघ्या काही दिवसांतच या चित्रपटाने ‘टॉप १० ट्रेंडिंग’ यादीत स्थान मिळवलं आहे.

या चित्रपटाचे नाव ‘थ्रॅश’ (Thrash) असे आहे. १० एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ओटीटीवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सध्या हा चित्रपट नेटफ्लिक्सच्या ‘टॉप १० ट्रेंडिंग’ यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. ‘थ्रॅश’ (Thrash) या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. अवघ्या १ तास २३ मिनिटांच्या या चित्रपटाने ३७.७ मिलियन व्ह्यूजचा टप्पा ओलांडला असून तो जागतिक स्तरावर ट्रेंड होत आहे.

प्रेक्षकांकडून या चित्रपटाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या काही दिवसांत या चित्रपटाने ३७.७ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवले असून तो जगातील ९३ देशांमध्ये ट्रेंड होत आहे. ‘थ्रॅश’ चित्रपटाच्या रेटिंगबद्दल बोलायचे झाल्यास, आयएमडीबीवर याला १० पैकी ५.२ रेटिंग मिळाले आहे.

हा एक अमेरिकन ‘सर्वायव्हल थ्रिलर’ चित्रपट असून टॉमी विर्कोला यांनी याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात फीबी डायनेवर, व्हिटनी पीक आणि जिमन हौंसौ हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

थ्रॅश चित्रपटाची कथा

थ्रॅश चित्रपटाची कथा साउथ कॅरोलिनामधील एनिले शहरावर आधारित आहे. या शहरात ‘हेन्री’ नावाचे वादळ येते. या वादळामुळे शहराचे संरक्षक बांध फुटतात आणि बघता बघता संपूर्ण शहर पाण्याखाली जाते. या कथेत भयंकर वळण तेव्हा येतं, जेव्हा पुराच्या पाण्याबरोबर समुद्रातील हिंस्त्र ‘बुल शार्क’ (Bull Sharks) लोकांच्या घरात शिरतात. पुरात अडकलेल्या लोकांना आता केवळ वाढत्या पाणी पातळीपासूनच नाही, तर रक्ताच्या तहानलेल्या या शिकारी माशांपासूनही स्वतःचा जीव वाचवायचा असतो. तुमची उत्सुकता वाढवणारा असा हा थरारक चित्रपट आहे.

पुराच्या पाण्यात अडकलेले लोक या भयानक शिकारी माशांपासून स्वतःचा जीव कसा वाचवतात, असा या चित्रपटाचा थरार आहे. तुम्ही या वीकेंडला काय पाहायचं असा विचार करत असाल तर नेटफ्लिक्सवर थ्रॅश चित्रपट पाहू शकता.