scorecardresearch

Aarya 3 Teaser: डॅशिंग लूक, हातात सिगार अन्…, सुश्मिता सेनच्या ‘आर्या ३’चा टीझर पाहिलात का?

अभिनेत्री सुश्मिता सेनची ‘आर्या’ वेबसीरिज चांगलीच गाजली आहे

web series, sushmita sen aarya 3, ott web series, hotstar specials, aarya s3 on hotstar, Aarya 3 trailer, aarya 3 season release date, aarya 3 season, Aarya 3 release date, Aarya 3 cast, सुश्मिता सेन, आर्या, आर्या ३
(फोटो सौजन्य- सुश्मिता सेन इन्स्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनची ‘आर्या’ वेब सीरिज चांगलीच गाजली होती. या वेब सीरिजमधून सुश्मिताने कमबॅक केलं होतं. या वेबसीरिजचे आतापर्यंत २ सीझन प्रदर्शित झाले आहे. ज्यात सुश्मिताचा दमदार अभिनय पाहायला मिळाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुश्मिता तिसऱ्या सीझनच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. नुकताच या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनचा टीझर प्रदर्शित झाला.

सुश्मिता सेनने तिच्या इन्स्टाग्रामवर ‘आर्या ३’चा टीझर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुश्मिता खूपच डॅशिंग लुकमध्ये दिसत आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आर्या २’मध्ये सुश्मिताने तिच्या विरोधकांना संपवून आपल्या मुलांना घेऊन देश सोडून फरार झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. तिच्या मते आता सगळं काही ठीक झालं आहे. पण असं नाहीये, तिचा आणखी एक विरोधक आहे. ज्याची एंट्री ‘आर्या ३’ मध्ये दाखवली जाणार आहे.

आणखी वाचा- “१५ वर्षीय मुलाने मला विचित्र पद्धतीने स्पर्श…” सुश्मिता सेनने सांगितला ‘तो’ प्रसंग

‘आर्या ३’च्या टीझरमध्ये सुश्मिता सेन हातात सिगार घेऊन किलर लूक देताना दिसत आहे. सुश्मिता सेनचा हा डॅशिंग लूक खूपच कूल वाटत आहे. एका हातात सिगार आणि दुसऱ्या हातात बंदूक असलेली सुश्मिता सेन वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळत आहे. हा टीझर शेअर करताना सुश्मिताने वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनचं शूटिंग सुरू असल्याची माहिती दिली आहे. लवकरच ही वेब सीरिज डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 14:44 IST