बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपट पाहण्यास प्रेक्षक पसंती देतात. सध्या अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ आणि ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा : चैप्टर १’ हे चित्रपट खूपच चर्चेत आहेत. हे दोन्ही चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. ‘कांतारा : चैप्टर १’ हा २०२२ मध्ये आलेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाचा प्रीक्वेल आहे; ज्यात पुन्हा एकदा ऋषभ शेट्टीचा धमाकेदार अंदाज पाहायला मिळणार आहे.

या प्रीक्वेलचे प्रदर्शन होण्यासाठी अजून वेळ आहे. तोपर्यंत ‘कांतारा’सारखाच थरारक अनुभव देतील असे काही सिनेमे तुम्ही पाहू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच ५ सर्वोत्तम कन्नड चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. त्यातील थ्रिल पाहून तुम्हाला ऋषभचा शेट्टीच्या ‘कांतारा’ सिनेमाचाही विसर पडेल. हे चित्रपट तुम्ही ‘प्राइम व्हिडीओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सहज पाहू शकता.

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
train travel whole night joke
हास्यतरंग :  रात्रभर…
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट

हेही वाचा…हॉरर चित्रपट पाहायला आवडतात? OTT वरील ‘हे’ भयपट आणि त्यातील एकापेक्षा एक भीतीदायक सीन्स पाहून उडेल थरकाप, वाचा यादी

कावलुदारी

Kavaludaari On Amazon Prime Video :हेमंत राव यांनी दिग्दर्शित केलेला ‘कावलुदारी’ चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या थ्रिलर मिस्ट्री चित्रपटात अनंत नाग, अच्युत कुमार यांच्यासह अनेक कलाकार दिसले होते. या चित्रपटाची कथा एका पोलिसाच्या आयुष्याभोवती फिरते; ज्यामध्ये अशा अनेक गोष्टी उलगडतात की, ते पाहून तुमचे डोके फिरून जाईल. हा चित्रपट तुम्ही ‘प्राइम व्हिडीओ’वर पाहू शकाल.

वृत्र

Vrithra On Amazon Prime Video : कन्नड भाषेतील हा क्राइम थ्रिलर चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याचे दिग्दर्शन आर गौतम यांनी केले होते. रश्मिका मंदाना आणि काश बेलवाडी यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटाची कथा एका पोलिस इन्स्पेक्टरभोवती फिरते. तो अशा प्रकरणाची चौकशी करतो, जे पाहून प्रत्येक जण थक्क होतो. हा चित्रपटसुद्धा ‘प्राइम व्हिडीओ’वर पाहता येईल.

हेही वाचा…सस्पेन्स अन् ॲक्शन कलाकृती पाहायला आवडतात? वाचा नेटफ्लिक्सवरील वेब सीरिजची यादी

लूसिया

Lucia On Amazon Prime Video : ‘लूसिया’ हा २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला कन्नड भाषेतील सायकॉलॉजिकल थ्रिलर ड्रामा चित्रपट आहे, ज्याचे लेखन व दिग्दर्शन पवन कुमार यांनी केले आहे. चित्रपटात सितीश निनासम व श्रुती हरिहरन यांसारखे कलाकार झळकले आहेत. ही कथा निक्कीभोवती फिरते. निक्की हा थिएटरमध्ये काम करतो आणि त्याला निद्रानाशाची समस्या भेडसावते. एक विशेष गोळी घेतल्यानंतर तो एका वेगळ्या प्रकारच्या स्वप्नांमध्ये अडकतो. त्यानंतर घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील. हा चित्रपटसुद्धा ‘प्राइम व्हिडीओ’वर पाहता येईल.

माहिरा

Mahira On Amazon Prime Video : २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘माहिरा’ हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. ही कथा आई-मुलीच्या आयुष्याभोवती फिरते. त्या दोघी काही खुनी लोकांपासून पळत असतात. या सर्व घडामोडींचे कारण आईला माहीत असते. पण, परिस्थितीमुळे ती मुलीला काहीच सांगू शकत नाही. त्यानंतर कथेत एक ट्विस्ट येतो, जो तुम्हाला खूप रंजक वाटेल. हा चित्रपटसुद्धा ‘प्राइम व्हिडीओ’वर उपलब्ध आहे.

हेही वाचा…८ वर्षांचं भांडण मिटलं! अखेर गोविंदा व भाचा कृष्णा अभिषेक दिसणार एकत्र; कॉमेडियन म्हणाला, “आता मी तुम्हाला…”

1888

1888 On Amazon Prime Video‘1888’ हा कन्नडमधील उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे, हा चित्रपट गेल्या वर्षीच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नोटबंदीच्या काळातील कथा मांडली आहे. त्यामध्ये एक माजी सामाजिक कार्यकर्त्या संध्या शेट्टी (नीथू शेट्टी) या एका मोठ्या संकटात अडकतात. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बंद झालेल्या नोटांचा साठा जमा होतो आणि त्यानंतर त्या काय करतात हे पाहणे खूप मनोरंजक ठरते. हा चित्रपट ‘प्राइम व्हिडीओ’वर पाहता येतो.